ताज्या घडामोडीरमजान स्पेशललेख

याला जीवन ऐसे नाव

Advertisement

23 ramzan ul mubarak : याला जीवन ऐसे नाव

23 ramzan ul mubarak The decision to celebrate Eid very simply

23 ramzan ul mubarak : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा आठवडा आता शिल्लक राहिला आहे.

यावर्षी ईद अत्यंत साधेपणाने साजरी करायचा निर्णय झालेला असल्यामुळे ईदच्या तयारीची फारशी गडबड कुठेही दिसत नाही.

मशीदी बंद असल्यामुळे सर्वांना तरावीहच्या नमाज मध्ये कुरआन शरीफची तिलावत ऐकण्याची संधी मिळालेली नाही.

त्यामुळे घराघरातून कुरआन शरीफचे पठण सुरू आहे .अल्लाहचे नामस्मरण (जिक्र व अजकार) करून त्याची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतो आहे .

कयामत कधी येईल?

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (सल्लल्लाहो अलैहै व सल्लम)अल्लाहचे सर्वात प्रिय व्यक्तिमत्व आहे.

त्यांच्यामार्फत इस्लाम धर्म जगाला परिचित झाला असून हजरत पैगंबरांनी स्वतःच्या शुद्ध आचरणाने अल्लाहतआला ला अभिप्रेत असलेल्या सर्व गोष्टी विशद केल्या .

हजरत पैगंबरांना सादिक आणि अमीन म्हटले जात होते . म्हणजे सच्चे आणि अमानतदार .

त्यांच्या काळात लोक ज्यावेळी बाहेरगावी जायचे तेव्हा आपली अमानत त्यांच्या हवाली सुपूर्द करून जायचे . त्यांना खात्री होती की आपल्या धनसंपत्तीचे रक्षण येथे होईल .

व्यापार आणि व्यवहार करताना हजरत पैगंबरांनी कधी फसवणूक आणि खोटे बोलून कारभार केला नाही .

त्यामुळेच त्यांच्या काळातील व्यापारामध्ये अतिशय निपुण असलेल्या हजरत खदिजा ( रजि.) यांनी हजरत पैगंबरांची सचोटी पाहून त्यांच्याशी निकाह करण्याचा मनोदय व्यक्त केला .

शेवटचा अशरा मुक्तीचा

पैगंबरांना जे साथीदार मिळाले, त्यांनी सुद्धा अतिशय तन-मन-धनाने त्यांना साथ दिली.

इस्लामचे पहिले खलिफा हजरत अबूबकर सिद्दिक ( रजिअल्लाहो तआला अन्हो)हे त्यापैकीच एक.

हजरत पैगंबरांचे सर्वात विश्वासू सहकारी होण्याचा मान हजरत अबूबकर यांना प्राप्त झाला आहे.

इस्लाम धर्माची जाहीर घोषणा केल्यानंतर हजरत पैगंबरांच्या जोडीला पुरुषांमध्ये सर्वप्रथम इस्लाम धर्म स्वीकारणारे अबूबकर होते.

ते पण सच्चे होते म्हणून त्यांना सिद्दिक म्हणतात.हजरत पैगंबरांच्या साठी आपले सर्वस्व कुर्बान करण्याची त्यांची सदैव तयारी होती.

स्वतः हजरत पैगंबरांच्या सोबत राहिले.हजरत पैगंबरांच्या नंतर जेव्हा खलिफा निवडण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनी एक मुखाने यांचे नाव सुचवले.

खलिफा झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. शासनाचा पैसा उधळपट्टी करुन खर्च करायचं नाही. जे काही नियमानुसार मानधन मिळेल तेवढे घ्यायचे.

कृतज्ञता भाव महत्वाचा

त्यातही त्यांनी कपात केली .आजकालचे आपले राज्यकर्ते पदावर बसल्यानंतर शासनाची तिजोरी जणू आपली खाजगी मालमत्ता आहे अशा पद्धतीने तिचा वापर करतात.

Advertisement

स्वतःची दालने सजवतात. स्वतःचे भत्ते वाढवून घेतात. परंतु हा जनतेचा पैसा आहे आणि तो सांभाळण्याची जबाबदारी लोकांनी आपल्यावर दिली आहे

याची जाण ठेवून महिन्याला मिळणारे मानधन कमी करणारे अबूबकर यांच्यासारख्या लोकांची खरी आज आपल्याला गरज आहे.

ते खलीफा असताना एक दिवस पत्नीने सांगितले की घरामध्ये काहीतरी गोड करण्याची इच्छा आहे.

खलिफांनी सांगितले की मला जे काही मानधन मिळते त्यापेक्षा जास्त मी काही देऊ शकत नाही. त्यामुळे तुझी इच्छा पूर्ण करता येणार नाही.

एक दिवस जेवायला बसले असताना जेवणात गोड पदार्थ वाढण्यात आला. त्यांनी पत्नीला विचारले हा पदार्थ कुठून आला ?

तिने सांगितले की तुम्ही देता त्यातून थोडे थोडे पैसे जमा करून तयार केला आहे. दुसऱ्या दिवशी तेवढी रक्कम आपल्या मानधनात त्यांनी कमी करून टाकली याला म्हणतात आदर्श.

video : नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार

अत्यंत साधे जीवन ते जगले. शासकीय निधीतला एक पैसा (रुपया नव्हे) कधी आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी त्यांनी खर्च केला नाही.

लोकांनी दिलेली जबाबदारी ही महत्त्वाची असून या पदावर काम करताना केलेल्या प्रत्येक कृत्याचा हिशोब अल्लाह त आला ला द्यावा लागणार आहे.

ही जाणीव मनात ठेवून त्यांनी राज्याचा कारभार केला. आपल्या राज्यात कुणीही उपाशी राहता कामा नाही याची काळजी घेतली.

आज जगभरामध्ये सुद्धा अशी माणसे मिळणे दुरापास्त झाले आहे.कोरोणामुळे एक गोष्ट सिद्ध झाली आहे की जगण्यासाठी फार गोष्टींची आवश्यकता नाही.

फक्त दोन वेळचे जेवण पुरेसे आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी या अनावश्यक आहेत. गाड्या, बंगले यांची काहीही गरज नाही. खरंतर कोरोना आला मोठ्या लोकांमुळे.

पण त्याचा त्रास झाला सर्वसामान्य हातावर पोट भरणाऱ्या, राहायला घर नसलेल्या, खायला अन्न असलेल्या लोकांना.

ईश्वराने या आजाराने हे दाखवून दिले आहे की आपण प्रगतीचे जे ढोल वाजवतो ते सर्व निरर्थक आहे .साध्या जीवनशैलीचा स्वीकार करण्याची वेळ आता आली आहे.

येणाऱ्या काळात जगभरातील सर्व गणिते बदलणार असल्यामुळे पुन्हा लोक जुन्या जीवन शैली कडे वळतील असे आज तरी दिसत आहे.

दिव्य कुरआन – मार्गदर्शक

इस्लाम धर्मामध्ये डामडौल,गाजावाजा, देखावा या गोष्टींना थारा नाही. घर एवढे मजबूत बांधा जितके दिवस तुम्ही या जगात राहणार आहात असे एक बुजुर्ग नेहमी म्हणत.

जीवन जगण्यासाठी फार काही गोष्टींची आवश्यकता नाही. भौतिक सुविधांची सुद्धा गरज नाही.

परंतु या भौतिक सुखांच्या मागे लागून मानवाने आपले जीवन स्वतःच्या हातानेच कष्टप्रद करून घेतले आहे.

तेव्हा आपले जीवन होईल तेवढे साध्या आणि चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे . (क्रमश:)

सलीमखान पठाण
9226408082

Share Now