News Updatesरमजान स्पेशललेख

कृतज्ञता भाव महत्वाचा

Advertisement

Gratitude is important : रमजानुल मुबारक – २०

Gratitude is important

Gratitude is important : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याचा दुसरा अशरा आज संपन्न होत आहे.

मगफिरत अर्थात माफीचा हा कालखंड प्रत्येकाने आपल्या कृत्यांबद्दल अल्लाहची माफी मागून व्यतीत केला आहे.

आपल्याकडून घडणारे प्रमाद हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही चुका मुद्दाम केल्या जातात, काही अनावधानाने होतात.

कोणी कशाप्रकारे चुका केल्या हे परमेश्वर चांगल्या प्रकारे जाणतो.अनावधानाने झालेल्या चुका तो माफ करतो.

इस्लाम’ हा अरबी शब्द असून ‘सलाम’ म्हणजे ‘शांती’ हे त्याचे मूळ रूप आहे.

परंतु जाणून-बुजून मुद्दामहून केलेल्या चुकांची माफी अल्लाह सुद्धा देत नाही.

आपण जर ठरवून कुणाची निंदा-नालस्ती केली तर संबंधित व्यक्ती जोपर्यंत आपल्याला माफ करीत नाही तो पर्यंत अल्लाह सुद्धा तो गुन्हा माफ करणार नाही.

एखाद्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी कुणी षड्यंत्र रचले असेल तर त्यात तो स्वतः अडकतो.हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि कुणालाही कमी लेखू नका.

कुणाची निंदा करू नका. ज्याचा त्याचा हिशोब ज्याला त्याला आखेरत मध्ये द्यावा लागणार आहे. त्यामुळे इतरांची चिंता आपण करू नये. आपले आत्मपरीक्षण करावे.

अल्लाहच्या प्रती नेहमी कृतज्ञताभाव (शुक्रगुजारी) आपल्या मनात असला पाहिजे .आपण सदैव कृतघ्नपणा (नाशुक्री)करीत असतो.

दिव्य कुरआन – मार्गदर्शक

अल्लाहतआला हा आपल्या भक्तांवर खूप प्रेम करतो. सत्तर मातांपेक्षा जास्त प्रेम करतो. आपण त्याला विसरून जातो. तो आपल्याला विसरत नाही.

आपण अडचणीत सापडल्यावर देवाचा धावा करतो.तो मात्र दररोज आपल्यावर प्रेम करीत असतो.

आपल्या सर्व गरजा पूर्ण करीत असतो. आपल्याला तंदुरुस्त ठेवतो.एक छोटासा जरी आजार झाला तरी आपली अवस्था बिकट होते.

शरीराच्या प्रत्येक अवयवावर त्याची कृपा आहे. जे आंधळे आहेत त्यांना उजेडाचे महत्त्व समजते. जे अपंग आहेत त्यांना धडधाकटपणाचे महत्त्व समजते.

Advertisement

तेव्हा आपण सातत्याने नेहमी सदैव अल्लाहची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.पवित्र रमजान महिना सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे.

परंतु तरीसुद्धा सर्व लोकांना तो अन्नपुरवठा करीत आहे. दैनंदिन गरजेचे सामान सुरळीतपणे पुरवीत आहे. याबद्दल आपण निश्चितपणे त्याचे आभार मानले पाहिजे.

स्वार्थी पणामुळे आपण त्याला विसरून जातो. दुनियादारी मध्ये आपण इतके रममाण झालो आहोत कि अल्लाहच्या भक्तीकडे आपले दुर्लक्ष होते.

हजरत पैगंबर यांनी सांगितलेले मार्ग आपण सोडून दिले आहेत. परंतु तो त्याची जी खासियत आहे ती सोडत नाही .

आपल्या संरक्षणार्थ जकात

आपण त्याची प्रार्थना नाही केली तरी तो आपली दयालूता विसरत नाही . तो लगेच शिक्षाही देत नाही

संकट आले की आपण देवाचा धावा करतो आणि परिस्थिती सुधारली कि परत आपल्या दुनियेत रममाण होतो.

हे सर्व तो जाणतो.पण तो लगेच बदला घेत नाही. बदला घेण्याची वृत्ती त्याची नाही. तो माफ करणारा आहे . तो माफिस पसंत करतो .

म्हणूनच रमजान महिन्याच्या या कालखंडामध्ये ही दुआ प्रामुख्याने मागितली जाते कि , ऐ अल्लाह, तू माफ करणारा आहे,

माफिस पसंत करतो, मलासुद्धा माफ कर.ज्याच्या मनामध्ये कृतज्ञता असते तो दयाळू असतो. त्याच्या आचार आणि विचारात दयाभाव असतो .इतरांना मदत करतो .

आणि मदत करून अल्लाहशी जवळीक (कुर्ब)साधीत असतो .रमजान महिन्यात आपण सुद्धा मनोभावे त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे.

आपल्या आचरणाने कायमस्वरूपी त्याच्याबद्दलची कृतज्ञता केवळ शाब्दिक नव्हे तर आपल्या वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून सिद्ध केली पाहिजे.

चांगले केले तर चांगले होणार आहे. ही श्रद्धा मनामध्ये ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे. अल्लाहतआला ला सुद्धा हेच अभिप्रेत आहे.

हजरत पैगंबरांनी जो मार्ग आपल्याला दाखवला आहे, त्या मार्गानुसारच आपण आचरण केले पाहिजे. तरच आपली सुटका होणार आहे. हे प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे.(क्रमशः)

सलीमखान पठाण
9226408082

Share Now