ताज्या घडामोडी

दिव्य कुरआन – मार्गदर्शक

Advertisement

The Divine Quran – Guide : रमजानुल मुबारक – १८

The-Divine-Quran-Guide

The Divine Quran – Guide : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिना आपल्या अंतिम चरणाकडे मार्गक्रमण करीत आहे .

दोन दिवसांमध्ये मगफिरत (माफी ) चा कालखंड समाप्त होऊन जहन्नुम पासून मुक्तीचा काळ सुरू होणार आहे .

खरंतर रमजान महिन्याचा विद्यमान कालखंड म्हणजे ईदच्या तयारीचे , धावपळीचे दिवस. परंतु यावर्षी अल्लाहतआला ने कोरोनाच्या रूपात एक संकट पूर्ण जगामध्ये निर्माण केले.

मस्जिदचा चंदा गोरगरिबांना : उमर मस्जिद

त्याने सगळ्याच गोष्टींचा आनंद हिरावून घेतला.जगाबरोबर राज्यातही अनेक लोक आत्तापर्यंत बळी गेले. त्यामुळे दरवर्षी असणारा ईदचा आनंद यावेळी नाही.

मशीदी बंद असल्याने तरावीहच्या नमाज मध्ये दरवर्षी मिळणारा आनंद यावेळी नाही. ईदसाठी नवे कपडे घ्यावे असे कुणालाच वाटत नाही.

म्हणून ही सुद्धा अल्लाहची मर्जी समजून यावर्षी सर्व मुस्लिम समाजाने अत्यंत साधेपणाने ईद साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

तरावीहच्या नमाज मध्ये दरवर्षी संपूर्ण कुरआन शरीफ चे वाचन आणि पठण केले जाते. ही साडे चौदाशे वर्षांची परंपरा आहे.

त्यामाध्यमातून कुरआनचा संदेश आणि त्यामध्ये अल्लाहतआला ने मानव जातीसाठी केलेले मार्गदर्शन समजून घेतले जाते.

मानव जातीच्या कल्याणासाठी हा दैवी ग्रंथ अल्लाहने पाठवला. यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उकल नमूद केली आहे.

मस्जिदचा चंदा गोरगरिबांना : उमर मस्जिद

पण त्यासाठी वारंवार कुरआन पठण करून, त्यावर चिंतन करून तो समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या हातून कोणत्याही प्रकारची चूक घडायला नको.

Advertisement

त्यासाठी कुरआनच्या दिव्य प्रकाशामध्ये प्रश्न सोडवले गेले पाहिजे. हजरत पैगंबरांच्याकाळात त्यांचे अनुयायी (सहाबा) कुरआनला खूप समजून घेत.

एकट्या सूरए बकरा चे आकलन करून घेण्यासाठी त्यांना आठ वर्ष लागल्याची नोंद इतिहासात आहे. ते दररोज आठ-दहा आयत पठण करीत .

त्यांचा अर्थ समजून घेत . त्याच्यावर स्वतः अंमल करीत . आणि मग पुढचे पाठ सुरू होत . केवळ तरावीहमध्ये कुरआन पठण केल्यामुळे त्याचे हक्क आदा होत नाही .

कुरआनमध्ये अल्लाह तआला ने दिलेली शिकवण प्रत्येकाने प्रत्यक्ष आचरणात आणली पाहिजे. जगातील प्रत्येक मानवासाठी हा ग्रंथ आहे.

जर आपण त्यातील अल्लाहच्या आदेशाप्रमाणे वागायला सुरुवात केली तर या जगामध्ये कोणताही प्रश्‍न शिल्लक राहणार नाही. दुर्दैवाने हे घडत नाही.

वेगळे विचार, वेगळे आचार यामुळे मूळ प्रश्न समजून न घेता प्रत्येक जण आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो.

शेवटचा अशरा मुक्तीचा

आम्ही मनमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात रब चाही जिंदगी व्यतीत करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी वारंवार कुरआन समजून घेऊन त्याचा अर्थ आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटनांबद्दल कुराणमध्ये कठोर शिक्षा सांगितलेली आहे. आजही अनेक वाईट घटना घडतात.

परंतु गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न होतात. यामुळे जे पीडित आहेत, त्यांच्यावर अन्याय केला जातो.

अल्लाहच्या नजरेत हा न्याय नाही.जेव्हा अन्याय आणि अत्याचार वाढतात. त्यावेळी पृथ्वीवर कोरोना सारखी संकटे,

भूकंप, अतिवृष्टी, वादळे, मोठे अपघात, अग्नितांडव अशा घटना घडतात.

त्यासाठी आपल्या जीवनामध्ये कुरआन शरीफचा अंगीकार करून त्यामधील मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचा संकल्प सर्वांनी करण्याची आवश्यकता आहे .

अल्लाहतआला आम्हाला आमच्या जीवनामध्ये सत्य मार्ग स्वीकारण्याची सुबुद्धी देवो . आमीन.(क्रमशः)

सलीमखान पठाण
9226408082

Share Now

One thought on “दिव्य कुरआन – मार्गदर्शक

Comments are closed.