ताज्या घडामोडीरमजान स्पेशललेख

इन्सानियत अर्थात मानवता

Advertisement

27-ramzan-ul-mubarak :इन्सानियत अर्थात मानवता

27-ramzan-ul-mubarak-in-the-islamic-system-zakat-is-the-best-means-of-eradicating-poverty

27-ramzan-ul-mubarak : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याचे आता शेवटचे दोन किंवा तीन दिवस शिल्लक राहिले आहेत.

त्यामुळे प्रत्येक जण या शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त पुण्य कसे प्राप्त करता येईल या विवंचनेत आहे.

ज्यांनी आपली जकात आदा केली आहे ते निश्चिंत झाले आहेत. काही जण अद्यापही आपली जकात देत आहेत.

कारण आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे पैसे वेळेवर उपलब्ध झालेले नाहीत. नोकरदार वर्ग पगाराच्या प्रतीक्षेत आहे.

अल्लाहच्या मर्जीसाठी दान

ते सुद्धा जकात देण्यास आतुर झालेले आहेत. देणारे आणि घेणारे ठरलेले आहेत.खरं तर इस्लामी समाज व्यवस्थेमध्ये जकात ही दारिद्र्य निर्मुलनाचे उत्तम साधन आहे.

आपण मात्र प्रचलित काळामध्ये तिला दान धर्माचे स्वरूप दिले आहे.

एखाद्याला दहा हजार रुपये जकात काढावयाची असेल तर ते दहा लोकांना जर हजार हजार दिले तर दहा लोक खर्च करून टाकतात.

परंतु एकाला जर दहा हजार रुपये दिले तर त्यातून तो स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करून स्वयंपूर्ण होऊ शकतो.

महत्त्वपूर्ण शब ए कद्र (27-ramzan-ul-mubarak )

तो स्वयंपूर्ण झाला म्हणजे समाजातील एक गरीब कमी होऊन दारिद्र्य निर्मूलनाला हातभार लागला असा त्याचा अर्थ होतो.

त्यादृष्टीने समाजातील जबाबदार लोकांनी पुढील काळामध्ये पावले टाकण्याची गरज आहे.

वृद्ध, वयस्कर, विधवा, अनाथ, शारीरिक विकलांग, आजारी अशा लोकांना गरजेनुसार मदत करणे आवश्यक आहे.

परंतु जे लोक शारीरिक दृष्ट्या सक्षम आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. अशांना मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Advertisement

महत्त्वाची गोष्ट म्हणजे जकात ही अल्लाहच्या मर्जी साठी व त्याच्या आदेशाचे पालन म्हणून द्यायची आहे.

मस्जिदचा चंदा गोरगरिबांना : उमर मस्जिद

सरकारचा इन्कम टॅक्स भरताना आपण कोणतीही कुरकुर करीत नाही. तो भरावाच लागतो. न भरल्यास कारवाईचे बडगे उगारले जातात.

म्हणून आपण तो निमूटपणे भरतो. इथे आपली जकात, आपले उत्पन्न आणि आपलीच मर्जी. फक्त हिशोब मात्र तो ठेवतो. जे इमाने इतबारे जकात आदा करतात.

ते फायद्यात राहतात. जे कुचराई करतात ते अडचणीत येतात. भक्तांना अल्लाहने खूप स्वातंत्र्य दिले आहे. परंतु आपण त्याचा सदुपयोग करीत नाही.

असो. रमजानच्या शेवटच्या दिवसांमध्ये जकाती बरोबरच फितरा आदा केला जातो . फितरा म्हणजे सदका. अर्थात दान.

प्रेषित हजरत पैगंबरांनी रोजेदाराकडून रोजाच्या अवस्थेमध्ये घडणार्‍या किरकोळ चुकांच्या भरपाईसाठी आणि गोरगरिबांच्या जेवणासाठी फितरा फर्ज केला आहे.

शेवटचा अशरा मुक्तीचा

ईदच्या नमाज पूर्वी फितरा आदा करणे जास्त लाभदायक आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक किलो ६०० ग्रॅम गहू किंवा त्याची किंमत ही फितरा म्हणून दान केली जाते .

कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या वतीने हे दान करू शकतो.

याचे लाभार्थी सुद्धा समाजातील गरजू , गोर-गरीब घटकातील लोक असतात. फितरा आदा करून आपले रोजे पवित्र केले जातात.

नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार

इस्लाम धर्माने जगाला मानवता अर्थात इन्सानियत ची शिकवण दिली आहे. सर्व मानव समान, नको गर्व नको अभिमान.

हे तत्व इस्लामने जगाला दिले आहे. या तत्त्वाचा स्वीकार केल्यास प्रत्येकाचे कल्याण होणार आहे. ईश्वर सर्वांना सुबुध्दी देवो .आमीन . (क्रमशः)

सलीमखान पठाण
9226408082.

Share Now