पुणे शहरातील आणखीन एक गुन्हेगारावर एम.पी,डी.ए.अंतर्गत कारवाई

सजग नागरिक टाइम्स : पुणे शहरातील सहकारनगर भागातील गुन्हेगारावर एम.पी,डी.ए.अंतर्गत कारवाई
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणारा गुन्हेगार इसम नामे गणेश सुभाष मसुरकर, वय २५ रा कोलवडी पोष्ट जावळी,तालुका भोर,जिल्हा पुणे हा अभिलेखावरील सराईत गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे.
[metaslider id=2853]
त्याने साथीदारांन सोबत सहकारनगर,भारती विध्यापीठ, वाकड पोलीस ठाणे परिसरात कोयता ,तलवार ,यासारखी जीव घेणी हत्यारे वापरून,खून ,खुनाचा प्रयत्न,दुखापत,पळवून नेणे,यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.त्याचे गुन्हेगारी कृत्ये सन २०१० पासून चालू आहेत. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्याचे विरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत,त्याचे विरुद्द प्रतिबंधक कारवाई करण्यात येऊन सुद्धा त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर काहीएक परिणाम होत नसल्याने त्याच्यापासून स्थानिकांना जीवितास व मालमत्तेस नुकसान होईल यामुळे रविंद्र कदम पोलीस सहाय्यक आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली व आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार ६ नोव्हेंबर गुन्हेगार रोजी गणेश सुभाष मसुरकर यास एम.पी,डी.ए. कायद्या अंतर्गतएक वर्षा करीता कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Leave a Reply