Homeताज्या घडामोडीबळजबरीने मुस्लिम परिवाराला रंग लावणाऱ्या उपद्रवींवर पोलिसांची कडक कारवाई.

बळजबरीने मुस्लिम परिवाराला रंग लावणाऱ्या उपद्रवींवर पोलिसांची कडक कारवाई.

4 आरोपींवर बिजनोर पोलीसांनी केले गून्हे दाखल

सन हे लोकांमध्ये आनंद व उत्साह निर्माण करण्यासाठी येत असतात. व दोन समुदायांना एकत्रित आणण्यासाठी असतात. पण काही उपद्रवी धर्मांच्या आड मध्ये स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी लोकांना इजा पोहोचविण्यासाठी कार्य करत असतात.

आज भारतभर होळीसारखा पवित्र सण साजरा होत असताना काही उपद्रवी लोकांनी एक मुस्लिम कुटुंबीयांना अडवून त्याच्यावरती रंग लावून, नारे देऊन भीती निर्माण केली.

तसेच दोन महिलांवर बळजबरीने रंग लावून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

सदरील व्हिडिओ हा सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर बिजनोर पोलिसांनी अशा चार उपद्रवींना ताब्यात घेतले असून एकाला अटक केली आहे .

तसेच तीन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चारही आरोपींवर कलम 147 /341 /323 /504 /509/ 354 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.
अनिरुद्ध शिशुपाल वर्मा असे अटक आरोपी चे नाव आहे.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular