ताज्या घडामोडी

छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमम्र अभिवादन

Advertisement

sambhaji maharaj smrutidin : छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीदिना निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण

sambhaji maharaj smrutidin

sambhaji maharaj smrutidin :सजग नागरिक टाइम्स :छत्रपती संभाजी महाराज  यांच्या स्मृतीदिनानिमित्त

पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सकल मराठी समाजाच्यावतीने

छत्रपती संभाजी महाराज  यांच्या प्रतिमेस भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहर युवक अध्यक्ष विकास साळवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विमम्र अभिवादन करण्यात आले .

तर आंबेडकर चळवळीतील जेष्ठ नेते मुरलीधर जाधव यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .

यावेळी सकल मराठी समाजाचे अध्यक्ष राजेश खडके , शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल पवार , मानवी सुरक्षा महासंघाचे अध्यक्ष अशोक माने ,

 सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रफुल्ल गुजर , कबीर विचार मंचचे अध्यक्ष शरद गायकवाड ,

 रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे पदाधिकारी भागवत कांबळे , महार योध्दा अंकुश गायकवाड , 

विजय वाघ व पारधी समाजाचे नेते हिरूभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

दौंड च्या कब्रस्तानात चालत होता जादूटोणा

यावेळी भारिप बहुजन महासंघाचे पुणे शहर युवक अध्यक्ष विकास साळवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , 

संभाजी राजे समतावादी होते तर आजचा हिंदूवादी म्हणून घेणारे जातीयवादी का ? असा सवाल उपस्थित करून भगव्याशी माणुसकीचे ,  

तथागत बुध्दापासून ते आजपर्यंत आहे . कारण भगव्याने या भूतलावर प्रेम , मैत्री आणि करुणेचा संदेश दिला .

आजचे भगवे म्हणणारे जाती धर्माच्या नावावर माणसामाणसामध्ये भांडणे लावून दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न का करतात ? 

अठरा पगड जातीला सोबत घेयून छत्रपती शिवाजीराजेनी स्वराज्य स्थापन केले आणि याच स्वराज्यात जातीय विषारी बी पेरून देशाला नासविण्याचा प्रयत्न का केला जात आहे ? 

छत्रपती शिवरायांना डोळयासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जाळून समतावादी संविधानाची निर्मिती केली .

Pune Ganpati Visarjan Miravnuk दरम्यान दोन गटात वादविवाद|Nagarsevak Avinash Bagve|Tushar patil

म्हणूनच आज न्यायालयात न्याय छत्रपती शिवरायांचा तर संविधानात लेखणी भीमरायांची .

माणूस जोडण्याचा न्याय छत्रपती शिवरायांच्या विचारात व भीमरायांच्या विचारात असताना अधर्म बुध्दी घेऊन देशात जातीयता कशाला ? असे विकास साळवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले .

Share Now

Leave a Reply