Show cause notice:गट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिस

Show cause notice: Nashik :माहिती अधिकारातील अपील सुनावणीला अनुपस्थित राहील्या मुळे
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीचे जनमाहिती अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटिस देण्यात आली .
याबाबत सविस्तर वृत्त असे कि अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिति पुणे तर्फे अध्यक्ष नितिन शशिकांत यादव यांनी
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी गावातील जिल्हा परिषद शाळेविषयी माहिती अधिकारात माहिती मागितली होती .
तथापी जन माहिती अधिकारी यांनी मुदत संपुन गेल्यानंतरही माहिती दिली नाही .
त्यामुळे यादव यांनी नाशिक जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्याकड़े त्याविरुद्ध प्रथम अपील दाखल केले होते .त्याप्रमाणे दि 24 जुलैला नाशिक जिल्हापरिषद येथे सुनावनी झाली .
सदर सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी दि 15 जुलैला अगाऊ कळवले असतानाही जनमाहिती अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी उपस्थित राहिले नाहीत.
त्यामुळे सदर अधिकाऱ्यास माहिती अधिकाराबाबत गांभीर्य नसल्याचा शेरा मारून शिक्षण अधिकारी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.