Savitribai Phule : स्त्री-शिक्षणाची सुरुवात , स्त्री-शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुलेआणि फातिमा बी शेख
Savitribai Phule : सजग नागरिक टाइम्स : (१८३१-१८९७) उच्चभ्रू वर्गातील महिलांमधून शिक्षण घेणारी काही उदाहरणे १९व्या शतकात आढळतात.
परंतु मध्यम, कनिष्ठ वर्गीय, व अस्पृश्य वर्गातील मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने प्रथम पाऊल टाकले ते फुले दांपत्याने.
त्यांनी शिक्षणाबरोबर समाज सुधारणेसाठी, स्त्री-जीवनाच्या उद्धारासाठी जीवापाड प्रयत्न केले.
सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे माळी समाजात ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. वडील खंडोजी पाटील गावाचे पाटील होते.
वडिलांच्या स्वभावा प्रमाणे सावित्रीमध्ये धीटपणा होता. त्यांच्याकडून सावित्रीबाईला व्यवहारचातुर्याचे, करारीपणाचे,
व योग्य न्यायनिवाड्याचे धडे मिळाले. त्या काळातील रीतीरिवाजा-प्रमाणे सावित्री बाईचा विवाह आठ-नऊ वर्षांची असतानाच झाला.
जोतीबा फुलेंची सावित्री केवळ अर्धांगिनीच नव्हे तर सर्वतोपरी सहकार्य करणारी स्वामिनी होती. जोतीबांनी सावित्रीबाईंना प्रथम साक्षर केले.
फुल्यांच्या समाजकार्यातील शिक्षणप्रसार विशेषतः स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करण्याचे जोतीबांचे स्वप्न होते. ते साकार होण्या साठी सावित्रीबाईंचा मोठा हातभार लागला.
सावित्रीबाईंनी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिके चे ट्रेनिंग घेतले.
या काळातील सर्वच स्त्रीवर्गाची समाजातीलअवहेलना, हालअपेष्टा, सर्व प्रकारचे कष्ट करूनही नगण्य स्थान ह्यांचा खोल ठसा सावित्रीबाईंच्या मनावर उमटलेला होता.
तेव्हा त्यांनी दलितोद्धार आणि स्त्री-शिक्षण यासाठी अपार कष्ट उपसण्याची तयारी केली.
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा,
अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर प्रथम स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे, स्त्री साक्षर झाली पाहिजे. एक स्त्री साक्षर झाली म्हणजे तिच्या सान्निध्यात,
सहवासात येणारी घरातील सर्व मंडळी साक्षरतेचे महत्त्व ओळखतील. साक्षर होतील. त्यातून समाज साक्षर होईल.
समाज सुधारला म्हणजे समाज-सुधारणेला गती येईल हे उद्दिष्ट जोतीबांच्या समोर होते. ते त्यांनी सावित्रीबाईंसमोर ठेवले.
freedom fighter भाग 8, मुख्तार अहमद अंसारी
रंजली गांजलेली दलित-मुस्लिम मंडळी आणि समाजाने रूढ़िपरंपरेने नगण्य ठरविलेली स्त्री सुधारण्याच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले.
काही उच्चभ्रूच्या टीकेमुळे छळामुळे जोतीबांचे वडील गोविंदरावांना खूप मनस्ताप सहन करावा लागला.
नातेवाईकांचा रोष व त्यांच्या होणाऱ्या निंदेमुळे जोतीबा फुले व सून सावित्रीबाई यांना राहत्या घरातून मोठ्या जडअंतःकरणाने घराबाहेर काढले.
वडिलांच्या घरातून अंगावरच्या कपड्या निशी बाहेर पडल्यावर जोतीबां प्रमाणे सावित्रीबाईच्या पुढे संसाराचा व सामाजिक कार्याचा मोठा पेच पडला.
अशा बिकट प्रसंगी कोणी ही आसरा देण्यास पुढे येत नव्हते. त्यावेळी पुन्हा एकदा मुसलमान सद्गृहरथ फुले दापत्यांच्या मदतीला धावून आले.
उस्मान शेख हे महात्मा फुल्यांचे जिवलग मित्र. त्यांनी आपल्या गंज पेठेतील घरातील जागाच दिली असे नव्हे तर संसारला लागणारी भांडी कुंडी व कपडेसुद्धा दिले.
१८४८ मध्ये जोतीबा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. एका भारतीयाने भारतीयां साठी प्रामुख्याने स्त्रियांसाठी काढलेली ही पहिली मुलींची शाळा ठरली.
मे १८४८ रोजी पुणे येथील उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेची स्थापना व सावित्री बाईचे अध्यापन कार्य सुरू झाले.
या पहिल्या मुलींच्या शाळेतील भारतातील पहिल्या स्त्रीशिक्षिका सावित्रीबाई होत्या. समाजाचा प्रखर विरोध या वेळी त्यांना सहन करावालागला.
फूले दंपतीने शिक्षिका तयार करण्यासाठी जे ‘नॉर्मल स्कूल’ काढले त्या मधून ट्रेंड झालेल्या पहिल्या विद्यार्थिनी व पहिल्या शिक्षिका म्हणजे फातिमा शेख होत.
तसेच एकोणीसाव्या शतकातील त्या भारतातील पहिल्या मुस्लीम स्त्री शिक्षिका होत. उस्मान शेख यांच्या भगिनी फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंच्या बरोबर शिक्षिका म्हणून उत्तम काम केले.
सावित्रीबाई आणि फातिमा या दोघी एका – एका मागासलेल्या समाजातील मुलींच्या शाळेवर होत्या. या दोघींचे अध्यापन कार्य सर्व दृष्टीने उठावदार आणि गुणवत्ता पूर्ण असे ,
हिंदू समाजातील दलितां बरोबरच मुसलमान बांधवांच्या दरिद्रीमागासले पणाची व दैन्याची जाणीव जोतीरावांना व सावित्रीबाईना होती.
Dar e arqam च्या 6 व्या Annual day मध्ये 350 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे केली जनजागृती
म्हणनूच आपल्या शाळेतून अस्पृश्य व बहिष्कृतांबरोबरच त्यांनी मुसलमान समाजातील मुला मुलींनाही कटाक्षाने प्रवेश व शिक्षण दिले.
एवढेच नव्हे तर श्रीमती फातिमा बी या मुसलमान धर्मिय शिक्षिकेला हाताशी धरून शाळा चालविल्या. समाजाचा प्रखर विरोध या वेळी त्यांना सहन करावा लागला.
१८४८ ते १८५२ पर्यंतच्या काळात फुले दांपत्याने१८ शाळा काढल्या. कार्याचे क्षेत्र व्यापक झाले. मुली साक्षर होत गेल्या.
मुलींसाठी असलेल्या शाळेत संख्या वाढू लागली.(Savitribai Phule)सावित्रीबाईंच्या कामाचा व्याप वाढला. सहकारी शिक्षकांची गरज भासू लागली.
विष्णुपंत थत्ते, वामनराव खराडकर, सगुणाबाई क्षीरसागर, फतिमा शेख यांसारख्या सहकारी शिक्षकांच्या निरपेक्ष वृत्तीने समाज कार्याला गती येत गेली.
सावित्रीबाईंचे अध्यापन कार्य सर्वच दृष्ट्या उठावदार आणि गुणवत्तापूर्ण होते.
मुला-मुलींच्या शिक्षणावर त्यांच्या सभोवतीच्या वातावरणाचा परिणाम होत असतो,हे त्यांनी लक्षात घेतले होते. अशा प्रकारे स्त्री-शिक्षणा साठी सुरुवात झाली.
सलीम शेख, संदेश लाइब्ररी , पुणे.
संदर्भ : वरील सर्व संदर्भ खालील पुस्तकातून घेतले आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
आधुनिक भारतातील
स्त्री -जीवन पृ.२७
युगस्त्री : सावित्रीबाई फुले.
(पृ.७/५६) लेखक: राजाराम सूर्यवंशी
साबित्रीबाई फुले समग्र बाड:मय. (पृ.६०७/६०८) लेखक : डॉ मा.गो. माळी
(पृ. ११४) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
महात्मा फुले गौरव ग्रंथ (पृ.४२२) लेखक : हरी नरके महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग