Birth rates of girls : पुणे शहरांतील मुलींचा जन्मदर वर्षभरात चिंताजनक रीत्या घसरले : माहिती अधिकारात उघड
Birth rates of girls : सजग नागरिक टाइम्स : बेटी पढाओ बेटी बचाव चा नारा देणा-यानसाठी पुण्यात आव्हान निर्माण झाले आहे ,
पुण्यात मुलींचा जन्मदर घटल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांना मिळालेल्या माहिती अधिकारात स्पष्ट होत आहे .
जगभरात महिला दिनाची धामधूम सुरू असताना पुण्यात एक वर्षात मुलींचा जन्मदर दर हजारी २३ ने घसरणं ही चिंतेची बाब आहे.
स्त्री शिक्षणाची सुरुवात, स्त्री-शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुलेआणि फातिमा बी शेख
महापालिकेच्या आरोग्य विभागाने विवेक वेलणकर यांना माहिती अधिकारात २०१६ ते २०१९
या कालावधीतील पुण्यातील मुलं आणि मुली यांच्या जन्मदराची माहिती दिली आहे,
२०१६ मध्ये हजारी ९३२ असणारा मुलींचा जन्मदर २०१८ मध्ये ९२७ पर्यंत खाली घसरला जो की २०१९ या एकाच वर्षात ९०४ पर्यंत खाली घसरला आहे.
पुण्यासारख्या प्रागतिक शहरातील ही आकडेवारी धक्कादायक आणि चिंताजनक आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याखाली कडक कारवाई करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अवैध गर्भपात केंद्रांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
गेल्या वर्षभरात मुलींच्या जन्मदरात अचानक झालेल्या या चिंताजनक घटीमागे महापालिकेच्या
आरोग्य विभागाच्या गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात यावरच्या कारवाईत शैथिल्य आलंय का ?
याची खातरजमा पुणे मनपा आयुक्तांनी आपल्या स्तरावर करून घ्यावी अश्या आशयाची लेखी तक्रार जेष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी केली आहे .
Dar e arqam च्या 6 व्या Annual day मध्ये 350 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे केली जनजागृती |