ताज्या घडामोडीपुणे

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्याही कमानीवर राजकारण्यांचे नाव..

Advertisement

सजग नागरिक टाईम्स : मागील आठवड्यातच महात्मा फुले वाडा येथील कमानी वर नगरसेविकेनी स्वतःचे नाव टाकल्या नंतर महात्मा फुले प्रेमीनी ते काढून टाकले होते.

तसाच प्रकार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे उघडकीस आला आहे ,

येथे नवीन कमान बांधण्यात आली असून यावर ही खासदार गिरीश बापट,आमदार मुक्ता टिळक आणि हरिहर असे खाली नावे देण्यात आली आहे ,

याच्या निषेधार्थ काल ६जुन रोजी विविध स्थानिक पक्षा तर्फे निषेध करण्यात आला.

Advertisement
विविध पक्षाचे पदाधिकारी

यात मनसे,राष्ट्रवादी,शिवसेना काँग्रेस,माळी महासंघ,माळी सेवा संघ,आप व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर आपले नाव लिहण्या इतपत आपले कार्य आहे का ?,इतका प्रसिद्धी चा हट्टाहास का करावा हे सुध्दा यांना कळत नाही? याचा निषेध करावा तितका कमी आहे अश्या घोषणा ही देण्यात आले.

तसेच ही नावे ताबडतोब काढून टाकावी नाहीतर महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले यांचे अनुयायी हे नावे काढून टाकतील असा इशारा देण्यात आला.

Share Now