Homeताज्या घडामोडीपत्नीला सोडून पळून गेलेल्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश .

पत्नीला सोडून पळून गेलेल्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश .

सजग नागरीक टाईम्स:प्रतिनिधी पुणे – शाहरुख फारुख शेख याने फिर्यादी सोबत दिनांक १७/१/२०२१ रोजी लग्न केले .

लग्नानंतर शाहरुख फारुख शेख ,फरीदा फारुख शेख , शोएब फारुख शेख ,फरीन फय्याज शेख , मामा सासरे यांनी फिर्यादीच्या नणंदची केस कोर्टात चालू असल्याने वकिलांला व कोर्टात येणाऱ्या खर्चासाठी फिर्यादी कडे १५ लाख रुपयाची मागणी केली असल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे .

फिर्यादीच्या वडिलांनी शाहरुख शेख याला राहण्यासाठी हेवी डिपॉजिटवरती फ्लॅट घेऊन दिले तसेच घराच्या राशनचा खर्च देखील फिर्यादीच्या वडिलांनी उचलला .

आरोपी शाहरुख शेख हा काहीएक कामधंदा करीत नव्हता . तसेच आरोपी लोक लग्नाचा खर्च झाला म्हणून ते फेडण्यासाठी फिर्यादीकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते .

फिर्यादीचे वडिल देत होते . तरी देखील आरोपी फिर्यादीचा भयंकर प्रकारे मानसिक , शारिरीक व आर्थिक छळ करु लागले .

फिर्यादीला पैशांसाठी ब्लॅकमेल करू लागले . फिर्यादीच्या घरच्यांनी आरोपीला पैसे दिले नाही म्हणून आरोपी शाहरुख शेख हा फिर्यादीला सोडून पळून गेला .

जोपर्यंत फिर्यादी पैसे देत नाही तोपर्यंत आरोपी शाहरुख शेख हा समोर येणार नाही अशा धमक्या फिर्यादीला व फिर्यादीच्या घरच्यांना देत होता .

म्हणून फिर्यादी यांनी अॅड . साजिद ब शहा व अॅड . अमित मोरे यांच्या मार्फत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली परंतु पोलिसांनी तक्रारीवर दखल न घेतल्याने फिर्यादी यांनी अॅड . साजिद शाह यांच्या मार्फत लष्कर न्यायालयात केस दाखल केली होती .

मे . कोर्टाने सर्व आरोपी विरोधात भा.द.वि कलम ४ ९ ८ ए , ४०६ , ४१ ९ , ४२० , ३२३ , ५०४ , ५०६ ( २ ) , ३४ खाली कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले आहे .

आरोपी विरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा गु.रजि . क्र . ४७३ / २०२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .

पिडीत महिला फिर्यादी तर्फे अँड साजिद शाह व अॅड . अमित मोरे हे काम पाहत आहे .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular