(swargate name history) सवारगेट याचे स्वारगेट हे नाव हजरत राजा बाग शहा शेर सवार दर्गाह मुळेच..?
swargate name history : सजग नागरिक टाइम्स : देश व राज्यातील इतर जिल्ह्यातून पुण्यात अनेक लोक कामासाठी ये-जा करत असतात त्यांना स्वारगेट हे ठिकाण माहीत नाही असे क्वचितच लोक असतील ,
मुंबई मध्ये जसे दादर आहे , अगदी तसेच पुण्यामध्ये सवारगेट अर्थात (स्वारगेट ) आहे,
आता हे सवारगेट ( स्वारगेट ) हे नाव का ? आणि कशामुळे पडले हे ब-याच जणांना माहीत ही नाही,
पुण्यात सुमारे 150 / 200 वर्षापुर्वी सुफीसंत शांती आणि एक्याचा प्रसार व प्रचार करत असताना
त्यांच्या शिष्यापैकी एका शिष्याने त्यांची मजार (प्रतीकबर ) दरगाह शरीफ आजचे स्वारगेट याच्या मधोमध स्थापन केली होती,
व सर्व धर्मिय भावीक शेतकरी व इतर भाविक येथे येऊन त्यांची मनोभावी पुजा अर्चना करत असत
शेर सवार बाबा र.अ. यांच्या नावाने या परिसराला ओळखले जाऊ लागले येथे भाविकांचे ये-जा चालू झाल्याने
कालांतराने येथे थांबा बनविण्यात आले यामुळे या परिसराला लोक सवार गेट या नावाने ओळखू लागले ,
काही वर्षानी या दरगाहची देखभाल सुफीसंत हरे झेंडेवाले बाबा हे करू लागले,
हरे झेंडेवाले यांची मुख्यमजार (कबर ) हे रविवार पेठ येथे हरे झेंडेवाले दरगाह शरीफ या नावाने प्रसिध्द आहे.
हरे झेंडेवाले यांचे शिष्य माजी आमदार स्वर्गीय अमिनुद्दीनसाहेब पेनवाले हे होते , व बाबांचे सर्व आदेशांचे पालन आमदारसाहेब कटाक्षाने करीत असत,
बाबांच्या आशिर्वादाने ते निवडणुकीला ऊभे राहुन विजयी होऊन आमदार ही झाले,
इतर बातमी : गावातील मस्जिद बांधण्यासाठी किसन चव्हाणही प्रयत्नरत
आमदारसाहेबांच्या मध्यस्तीने माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे आदरणीय नेते मा. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाणसाहेब वेळोवेळी हरे झेंडेवाले बाबांना भेटण्यास येत व बाबांचे आशिर्वाद घेत असत,
व हरे झेंडेवाले बाबा हे स्वारगेट या ठीकाणी येऊन शेर सवारबाबा यांच्या दरगाह (मजार ) ची खिदमत करत असत,
सुफी संत हरे झेंडेवाले बाबा हे पुण्यातील अजुनही काही दरगाह शरीफ ची खिदमत करत व व्यवस्थापन आपल्या निगराणीखाली करीत असत,
रविवार पेठ येथील ( हजरत गौसपाक र.अ. ) ही दरगाह सुफी संत हरे झेंडेवाले बाबा यांची खिदमत व व्यवस्थापन करण्याचे मुख्य ठीकाण होते,
परंतु काही वर्षांनी सवारगेट अर्थात आत्ताचे स्वारगेट मोठे करण्यासाठी दरगाह शरीफ स्थलांतर करणे गरजेचे असल्या कारणाने,
स्वर्गीय आमदार अमिनुद्दीन पेनवाले यांनी पुढाकार घेऊन सुफी संत हरे झेंडेवाले बाबा यांना विनवणी करून
दर्गाहला स्वारगेट पासून जवळच असलेल्या बिबवेवाडी येथील आरक्षित जागेत स्तलांतरील करु असे सांगितले ,
यास सुफी संत हरे झेंडेवाले बाबा यांनी अनुमती दिल्यानंतर शेर सवार बाबा र.अ. यांची मजार दरगाह बिबवेवाडी येथे हलविण्यात आली असल्याची माहिती दर्गाह ट्रस्टचे जावेद शेख यांनी दिली ,
सदरिल दर्गाह संबंधित माहीती त्याचे पुर्वजांनी त्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील दरगाह्चे उर्स हे हिंदू मुस्लिम एकत्ररित येऊन साजरा करत असतात,
या दरगाह्चे उर्स हे होळी या सणाच्या पुढील आठवड्यात होत असते.
या वर्षी दरगाह्चे उर्स हे १४/३/२०२० रोजी साजरे होणार असल्याने सर्वांनी या उर्सला येण्याचे निमंत्रण देण्यात येत असल्याचे जावेद शेख यांनी सांगितले.