HomePolice Newsचैन चोरून पळ काढणाऱ्यास पकडून दिल्याबद्दल पोलिसांनी तरुणांचे केले सत्कार.

चैन चोरून पळ काढणाऱ्यास पकडून दिल्याबद्दल पोलिसांनी तरुणांचे केले सत्कार.

सजग नागरिक टाइम्स: पुणे: आज मंळवारी दुपारी ०३.३० वाजता च्या सुमारास डॉ. अर्णिका अखिलेश सिंग( वय २९ वर्षे, रा . शांतीनगर सोसायटी, गुरुवार पेठ ) या पायी चालत घरी जात असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील चैन जबरदस्तीने चोरून तेथून पळ काढला . त्यावेळी त्या मदती साठी ओरडा करत होत्या. घोरपडे पेठ येथे क्रिकेट खेळत असलेले स्थानिक तरुण गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे ,

उमेश काशीद,अभिषेक दिगंबर जाधव यांनी पळून जाणाऱ्या चोरास पाठलाग करून पकडले व घटनेच्या ठिकाणी तात्काळ पोहचलेल्या पोलिस निरिक्षक राऊत ( गुन्हे ) व पथकाच्या ताब्यात दिले . त्याच्याकडून चोरी केलेली चैन जप्त करण्यात आली आहे . या घटने बाबत खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नामे महेश लक्ष्मण सावंत (रा. थेरगाव, वाकड पुणे) यास अटक करण्यात आली आहे व पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक जाधव हे करीत आहेत.

चोरी करून पळून जाणाऱ्या आरोपीस मोठ्या धाडसाने पकडणारे स्थानिक तरुण नागरिक गोवर्धन विलास गोगावले, हेमंत विनायक झेंडे , उमेश काशीद, अभिषेक दिगंबर जाधव यांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत व धाडसाबाबत सतीश गोवेकर, सहायक पोलिस आयुक्त, फरासखाना विभाग व संगीता यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,खडक पोलीस स्टेशन यांनी या तरुणांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले.
तसेच या निमित्ताने नागरिकांनी देखील अशा प्रकारे धाडस दाखवून मदतीला पुढे यावे असे आवाहन खडक पोलिसांमार्फत करण्यात येत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular