(central Ministry officers ) केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी पुण्यातील रेशनिंग अधिकाऱ्यांच्या कामाची केली प्रशंसा
(central Ministry officers ) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :
नागरिकांना धान्य वेळेवर मिळते किंवा कसे व इतर पाहणीसाठी केंद्रीय मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी पुण्यातील रेशनिंग दुकानांना प्रत्यक्षात भेट दिली.
स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहकांसोबत चर्चा केली.व अचूक माप व योग्य किंमतीत धान्य मिळते का अशी विचारपुस केली ,
आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक चांगली कशी होईल यावर चर्चा करण्यात आली.
तसेच गरजू कुटुंबाच्या समावेशा संदर्भात गृह भेटि घेत व त्यातील अडचणी समजाऊन घेतले.
तर सदरील यंत्रणा अधिक प्रभावीपणे कशी काम करू शकेल यावर विचारणा केली.,
आणि तसेच केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी पुण्यातील रेशनिंग अधिकाऱ्यांची कामाची प्रशंसा देखील केली.
यावेळी केंद्रीय पथकातील अधिकारी तसेच अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, ब” परीमंडल अधिकारी एन.पी. भोसले, ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने,
पुरवठा निरीक्षक अनिल भागणे, विजयकुमार क्षीरसागर, सुनंदा येवले, प्राजक्ता माळी, दुकानदार कपिल गायकवाड,
दिप्ती गायकवाड, पार्वती महिला बचत गटाचे सय्यद भाभी तसेच शेकडो रेशनिंग कार्डधारक हजर होते.