कोंढवामध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

कोंढवामध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या (kondhwa pune)

Kondhwa pune kills young girl

kondhwa pune:पुणे शहरातील कोंढवा परिसर हे दिवसरात्र गर्दीने भरलेले असून सध्या तेथे कधीही सन्नाटा पाहायला नागरिकांना दिसत नसेल व दिसले तरीही क्वचितच दिसत असेल,

अश्या गजबजलेल्या ठिकाणी सकाळी ११.४५ वाजता एका तरुणाचा चाकूने हल्ला करून खून केला जातो म्हंटले तर आश्चर्याची बाब आहे.

कोंढवा परिसर हा अल्पावधीतच डेव्हलपमेंट झालेला असून पूर्वी प्रमाणे या परिसरातील गुन्हेगारी राहिलेली दिसत नाही.

Advertisement

एका छोट्याशा कारणावरून एका तरुणाचा खून करणे म्हणजे या ठिकाणी पोलिसांची व कायद्याची भीती संपत चाललेली दिसत आहे.

कोंढवा पोलिसांनी आत्ताच कडक पावले उचलण्यास सुरु केली नाही तर पूर्वी प्रमाणे या परिसरात गुंडगिरी जोर धरण्यास वेळ लागणार नाही.

कोंढवा परिसरातील आदितांश सोसायटी खालील हमजा हेअर सलून समोरील मोकळ्या जागेत

Advertisement

आकीब अल्ताफ शेख वय २६ या तरुणाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला.(murder case)

प्रकरण पुढील प्रमाणे ऐसर अल्ताफ शेख वय १८ हा आदितांश सोसायटी खालील हमजा हेअर सलून बाहेर दाडी करण्यासाठी थांबला होता.

त्या ठिकाणी सोसायटीत राहणारे सुद्दिन कुरेशी वय ३५ ,रियाज उर्फ युसुफ साबीर खान वय ३६,

Advertisement

महम्मद मुद्दसर अहमद पठाण वय ३२.जावेद हमीद इनामदार वय ४४

हे सर्व जन आले व ऐसर शेख या तरुणाला शिवीगाळ करत विचारू लागले कि तुझा बाप कोठे आहे.

तुझा बाप व रफिक बाबू शेख हे आमच्या सोसायटीत खूप लक्ष देत असून सोसायटीच्या वादात मध्यस्ती करत आहे.

Advertisement

असे म्हणत त्याच्या अंगावर धावून गेले.तितक्यात ऐसरचा भाऊ आकीब अल्ताफ शेख हा आला.

त्यांच्यात वाद वाढले व आरोपींनी ऐसर शेख याच्या छातीवर चाकूने वार करून,त्यानंतर आकीब यास धरून चाकू त्याच्या छातीत खुपसले.

या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.यासर्व आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केले असून त्यांच्यावर भाद्वी कलम ३०२,३२४,३२३,५०४,३४,महा.पो.कायदा.

Advertisement

कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी फियाद अल्ताफ शेख यांनी दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड करत आहे. 

Support our journalism - Support Sajag Nagrikk Times

One thought on “कोंढवामध्ये दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

Leave a Reply