(unauthorized construction) ४ मजल्यांची अनधिकृत इमारत जमीनदोस्त.
(unauthorized construction) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :
पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर पालिकेने जोरदार कारवाई सुरू केल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पुण्यातील अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असल्याने व नागरिकांची ओरड सुरू असल्याने पुणे महानगर पालिका अॅकशन मोड मध्ये येत कारवाई सुरू केल्या आहेत.
अशीच कारवाई पुण्यातील हडपसर हांडेवाडी रोडवरील सर्व्हे नं. ६५. येथील अनधिकृत बांधकामावर जॉ कटर च्या सहायांने कारवाई करण्यात आली आहे.
अनिश शेख व इतरांनी जागा मालक राजू मुखेरी यांची जागा विकसित करण्यासाठी घेतली होती.
सदरील जागेवर तळ मजला व त्यावर ४ मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. सदरील बांधकामाला २७ जानेवारीला नोटीस बजावली होती.
तरी काम सुरू असल्याने ३ फेब्रुवारी रोजी जॉ कटरच्या सहाय्याने बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता भूषण सोनवणे यांनी दिली आहे.