Homeताज्या घडामोडीअतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय  कार्यालयाच्या वतीने जाहीर...

अतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय  कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध

sajag nagrik times पुणे : दोन दिवसापूर्वी धानोरी येथे अतिक्रमण कारवाई करताना तेथील नागरिकांनी अतिक्रमण निरीक्षक व कर्मचारीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते.

याचा व्हिडीओ वायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. तसेच अतिक्रमण निरीक्षक व कर्मचारीवर हल्ला केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आलेत.

या हल्ल्यामुळे अधिकारी व कर्मचारी मध्ये संताप व भीती चे वातावरण निर्माण झाल्याने आम्ही कामे कसे करावे अशी भावना निर्माण झाली.

अतिक्रमण निरीक्षक व कर्मचारीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करताना भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

यावेळी पी एम सी एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष भास्कर महाडीक, उपअभियंता प्रवीण शिंदे, शाखा अभियंता सिमरन पिरजादे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर सोनवलकर,

कनिष्ठ अभियंता संजय शिंदे, कनिष्ठ अभियंता रावसाहेब खंडागळे ,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सय्यद आणि संतोष कदम यांच्यासह भवानी पेठ वॉर्ड ऑफिस मधील सर्व विभागातील संपूर्ण सेवकवर्ग यांनी सदर निषेध सभेस उपस्थित राहून झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात विरोध केला.

वाचा : अब मराठी भाषा में नेमप्लेट लगाना अनिवार्य

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular