सजग नागरिक टाइम्स :
पुणे: विश्राम बाग पोलीस ठाण्यात एका तरुणाने आत्महत्या केल्याने पुणे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीत चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने चर्चेला उधाण आले आहे .
शिवाजी उत्तम गरड असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे . सदरील घटना ही आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे .
गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने शिवाजी गरड याला वाहनचोरीच्या गुन्ह्यात १२ मे रोजी अटक केली होती.
तपासानंतर त्याला काल रात्री विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते .
आरोपीला झोपण्यासाठी दिलेल्या चादरीचा काठ फाडून त्यांची लांब दोरी तयार केली सकाळी तो संडासासाठी बाथरुममध्ये गेला तेथील जाळीला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
त्याने आत्महत्या केल्याचे बऱ्याच वेळाने आढळून आले . विश्रामबाग पोलीस कोठडीच्या मुख्य पॅसेजमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.मात्र , बाथरुममध्ये कॅमेरे नाहीत . असा प्रकार समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तसेच पोलिस कोठडीत आत्महत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीती व संशय निर्माण झाला आहे.