Homeताज्या घडामोडीनगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ

नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ

Nagarsevak Abuse |नगरसेवकाकडून अतिरिक्त आयुक्तांना शिविगाळ

Nagarsevak Abuse |सजग नागरिक टाइम्स :- पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाकडून

अतिरिक्त आयुक्तांना शिवीगाळ करण्यात आल्याची घटना
आज मंगळवारी घडली.

या घटनेमुळे स्थायी समितीच्या बैठकीत तणाव निर्माण झाला होता.

यामुळे चिडलेल्या महापालिका अधिकाऱ्यांनी सभात्याग करीत निषेध नोंदवला.

पुणे महापालिकेची दर मंगळवारी स्थायी समितीची बैठक होत असते.

या बैठकीला समितीचे सर्व सदस्य, महापालिका आयुक्त,

अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित असतात.

आज मंगळवारी सुरू असलेल्या बैठकीमध्ये विकास कामे,

निविदा याबद्दल चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकाने 50 लाखांच्या कामांवरून अतिरिक्त आयुक्तांना टार्गेट केले.

यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून चिडलेल्या नगरसेवकाने अतिरिक्त आयुक्तांना थेट शिवीगाळ केली.

चिडलेल्या अतिरिक्त आयुक्तांनी सभात्याग केल्यानंतर अन्य अधिकारींनीही घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत सभात्याग केला.

यानंतर पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड बैठकीमध्ये पोहोचले.

या नगरसेवकाकडे पिस्तूल हि होते असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular