corona virus issue : कोरोना वायरसमुळे पुणे महानगरपालिकेत प्रवेशबंदी..
ई-मेलद्वारे तक्रारी मांडण्याचे आव्हान.
corona virus issue : सजग नागरिक टाईम्स : पुणे : कोरोना वायरसमुळे केंद्रात, राज्यात, व पुणे शहरात चांगली दक्षता घेतली जात आहे.
यासाठी आणखीन एक पाऊल पुढे जात पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आजपासुन पुणे महानगर पालिकेत येणाऱ्या नागरिकांना प्रवेशबंदी घातली आहे.
पुण्यात सॅनिटायझर , मास्क पुरेशा संख्येत उपलब्ध : उत्पादक ,वितरकांची माहिती
महापालिकेच्या कार्यालयांमध्ये नागरिकांची कामासाठी गर्दी होत असल्याने पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह
सर्व क्षेत्रीय कार्यालय विविध परिमंडळ विभाग याठिकाणी नागरिकांना पुढील आदेशापर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यामध्ये न येता त्यांचे इमेल व अथवा लेखी स्वरुपात म्हणणे प्रशासनाकडे मांडायचे असल्याचे सांगण्यात आले आहे.
Pune | मनपाची जागा एका नगरसेवक व अधिकाऱ्यांने विकून खाल्ली ?
[…] कोरोना वायरसमुळे पुणे महानगरपालिकेत … […]