Fight the Coronavirus : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी येरवडा कारागृहातील कैद्यांना सुविधा पुरवा
Fight the Coronavirus : सजग नागरिक टाईम्स : अजहर खान :कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे.
त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाची यंत्रणा कामाला लागली असून नागरिकांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोजना सुरू असून त्यासाठी दक्षता पण तेवढीच घेतली जात आहे.
शाळा , महाविद्यालय , मॉल , बाजारपेठा, सिनेमा ग्रह, जलतरण तलाव व इतर कामकाज बंद ठेवण्याचे शासनाने निर्णय घेतला असून त्याला पुणेकर ही तेवढेच साथ देत आहे.
कोरोना वायरसमुळे पुणे महानगरपालिकेत प्रवेशबंदी..
तसेच येरवडा कारागृहात समते पेक्षा जास्त कैदी असल्याने कोरोना वायरचा दुष्परिणाम टाळण्यासाठी
कारागृहातील कैद्यांना भौतिक सुविधा पुरविण्याची अथवा सोडुण देण्याची मागणी एडवोकेट वाजेद खान बिडकर आणि
सामाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी थेट काराग्रह अधीक्षकांना पत्र पाठवून केली आहे.
त्या पत्रात म्हंटले आहे की कैद्यांना हात धुण्यासाठी लागणारे योग्य ते साहित्य वेळेवर दिले जावे,
रोज नव्याने दाखल होणाऱ्या आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय कारागृहात प्रवेश देऊ नये.
कैद्यांना मास्क व योग्य साहित्य पुरविण्यात यावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे.
Khed Shivapur दर्गा भावीकांसाठी पुढिल आदेश येइपर्यंत बंद राहणार|Corona Virus issue|