Homeताज्या घडामोडीपरभणीच्या आरडीसीला 50 हजाराची लाच घेताना अटक

परभणीच्या आरडीसीला 50 हजाराची लाच घेताना अटक

परभणीच्या आरडीसीला 50 हजाराची लाच घेताना अटक

परभणी येथे 17 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने सापळा रचून 50 हजाराची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अ‍ॅन्टी करप्शनकडे याबाबत तक्रार आली होती. पोलिस उपअधिक्षक नारायण बेंबडे यांच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करून सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर बहुतांश व्यवहार कॅशलेस होत असल्याने या प्रकरणातही 50 हजाराची लाच धनादेशाद्वारे स्विकारण्याचा फंडा वापरण्यात आला. विशेष म्हणजे महसुल विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः लाच न स्विकारता सेवानिवृत्त कर्मचार्‍यांमार्फत स्विकारत असल्याचे या प्रकरणात समोर आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरीचे हे प्रकरण घडले असून वरिष्ठ अधिकारीच जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात निवासी उपजिल्हाधिकारी बोधवड यांना अटक करून कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.

Share Now
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments