ताज्या घडामोडी

चोरट्याला हाताशी धरून पोलिसांचा कोट्यावधी रुपयांवर डल्ला

Advertisement

कोल्हापुरातल्या अट्टल चोरट्याला हाताशी धरून सांगली पोलिसांचा कोट्यावधी रुपयांवर डल्ला
 

पुणे : कोल्हापुरातल्या अट्टल चोरट्याला हाताशी धरून सांगली पोलिसांनी कोट्यावधी रुपयांवर डल्ला मारल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने 3 कोटी 18 लाख, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या पथकाने 6 कोटींच्या रोख रकमेवर डल्ला मारल्याच तपासात समोर आलं आहे.

या प्रकरणी सांगलीचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर घरफोडी, कट रचणे, शासकीय पदाचा गैरवापर करणे यांच्यासह अनेक गंभीर स्वरुपाचे दोन स्वतंत्र गुन्हे कोडोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

गेल्या वर्षी मैमुद्दीन मुल्ला या अट्टल चोरट्याने वारणा कोडोली इथल्या शिक्षण समूहाच्या शिक्षक कॉलनीतून 3 कोटी रुपयांची रक्कम लांबवली होती. त्याने ही रक्कम मिरजेत लपवून ठेवली होती. ही माहिती सांगली पोलिसांना कळताच तपासाच्या नावाखाली सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सोबत रवींद्र पाटील, दीपक पाटील, शंकर पाटील, प्रवीण सावंत या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारणेत येऊन 6 कोटींची रक्कम चोरुन नेली.

सदर माहिती त्यांचे वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ धनवट यांनी पुन्हा दुसऱ्या पोलिसांचं दुसरं पथक तयार करत दिपक पाटील, कुलदीप कांबळे, शरद कुरपळकर यांना घेऊन पुन्हा वारणानगर येथे येऊन 3 कोटी 18 लाखावर डल्ला मारला. या प्रकरणाची फिर्याद कोल्हापुरातील बांधकाम व्यवसायिक झुंझार सरनोबत यांनी वारणा कडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केली.
पीसीपी न्युज पणे : या प्रकारांमध्ये एकुणच, चोराला सोबत घेऊनच पोलिसांनी डल्ला मारल्याने पोलिसच चोरावर मोर ठरले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोल्हापूर पोलीस दलाने सांगलीतील दोषी अधिकारी आणि कर्मचऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Share Now

Leave a Reply