News Updatesताज्या घडामोडीराष्ट्रीय

गोवंश हत्याबंदी कायद्याच्या दुरुपयोगाबाबत हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

Advertisement

(Cow slaughter law ) सजग नागरिक टाइम्स :

Cow slaughter law : प्रयागराज: उत्तर प्रदेशामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याच्या होत असलेल्या दुरुपयोगाबाबत अलाहाबाद हायकोर्टाने चिंता व्यक्त केलीय.

या बरोबरट हायकोर्टाने गोहत्या आणि गोमांस विक्री प्रकरणातील आरोपीच्या जामिनाला देखील मंजुरी दिली आहे.

हायकोर्टाने आरोपी रहमू ऊर्फ रहमुद्दीन याला सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिलेत.

 न्यायाधीश सिद्धार्थ यांच्या एकसदस्यीय पीठाने हा आदेश दिला आहे.

वाचा : काही महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे : भवानी पेठेतील प्रकार,

Advertisement

 जेव्हा कोणतेही मांस पकडले जाते, तेव्हा ते गोमांस असल्याचेच सांगितले जाते, असे हायकोर्टाने  म्हटले.

अनेक वेळा याची तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये देखील केली जात नाही.

आरोपी रहमू ऊर्फ रहमुद्दीन च्या विरोधात शामलीच्या भवन पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता.

मात्र, आरोपीस घटनास्थळावरून अटक करण्यात आली नव्हती. आरोपी ५ ऑगस्ट २०२० पासून तुरुंगात बंद होता.

या बरोबर कोर्टाने राज्यात सोडण्यात आलेली गुरे आणि भटक्या गायीं बाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.

हिंग्लिश न्यूज वाचा : 6 Saal ki Masoom bacchi ka Rape Aur Murder

Share Now