Homeताज्या घडामोडीमोहम्मद पैगंबर जयंती निमित्त वाहतूकीत बदल

मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त वाहतूकीत बदल

सजग नागरिक टाइम्स: पुणे :
मागिल 2वर्षे कोरोनामुळे कोणतेच सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यात आले नाही.यावर्षी शासकीय परवानगी ने सर्व सण साजरे होत आहे.

दरवर्षी हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त पुणे शहरामध्ये मिरवणुका काढण्यात येत असतात . मनुशाह मस्जिद नाना पेठ पुणे या ठिकाणावरुन मुख्य मिरवणुकीला सुरुवात होत असते .
या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव सहभागी होत असतात, तसेच ट्रक , जीप , रिक्षा वाहनांचा मोठया प्रमाणात समावेश होत असतो .

त्यामुळे वाहतूक सुव्यवस्था तसेच सुरक्षितता याचा विचार करून वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे

.मनुशाह मस्जिद , 482 नाना पेठ पुणे येथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात होते व मिरवणुक संत कबीर चौक , ए.डी. कॅम्प चौक , भारत सिनेमा , पद्मजी पो . चौकी चौक , निशाद थियेटर , भवानदास चाळ , चुडामण तालीम , मुक्तीकोज चौक , डावीकडे वळून गाएकसाब मस्जिदचे मागून बाबाजान दर्गा चौक , चारबावडी पो . चौकीचे पाठीमागून छ.शिवाजी मार्केट ते सेंटर स्ट्रीट रोडने उजवीकडे वळून भोपळे चौक , गाएकसाब मस्जिद समोरील मुक्तिफौज चौक ते पुलगेट चौक ,

डावीकडे वळून एम . जी . रोडने कोहिनूर चौक , महावीर चौक , डावीकडे वळून साचापीर स्ट्रीटने महात्मा फुले चौक , संत कबीर चौक , नानापेठ चौक , अल्पना सिनेमा ते हमजेखान चौक , डावीकडे वळून गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून सुभान शहा दर्गा चौक , सिटीजामा मस्जिद शुक्रवार पेठ , पुणे येथे सांगता होते .

या भागातील मिरवणूक पुढे जाईल . तसे वाहतूकीची परिस्थितीनुसार व आवश्यकतेनुसार तेथील वाहतुक बंद केली जाईल अथवा अन्य मार्गाने वळविण्यात येईल .

तसेच , या मार्गावर केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा . फायरब्रिगेड , पोलीस वाहने , रुग्णवाहिका इ . ) यांना परवानगी असणार आहे . तरी वाहन चालकांनी पोलीसांना सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी , असे आवाहन पुणे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीराम यांनी नागरिकांना केले आहे .

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular