(municipal elections) मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय
(municipal elections) सजग नागरिक टाइम्स :
आज महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आज राज्यमंत्रिमंडळामध्ये एकमताने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी मुंबई वगळता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार आहे.
आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली होती.
या बैठकीमध्ये महानगरपालिका निवडणुकांबाबतच्या प्रभाग रचनेबाबत चर्चा करण्यात आली .
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२२
त्रि सदस्य प्रभागाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो , या निवडणुकीत नक्कीच सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचा महापौर होईल. पुणे मनपा मध्ये महाविकास आघाडी ची सत्ता येऊन गेली ५ वर्षातील खादाड राक्षंसी बिजेपी चा पराभव होईल हे निश्चित
आपला – योगेश दत्तात्रय ससाणे
नगरसेवक -पुणे मनपा
प्रवक्ता – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर
मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे.
वाचा : पुणे कॅम्प परिसरातील दिल्ली दरबार, सुजाता मस्तानी, शेगाव कचोरीवर सील बंद ची कारवाई
मात्र निवडणूक होण्यापूर्वीच सत्ताधारी शिवसेना व भाजप यांच्यामधील वादविवाद वाढू लागले होते.
राज्य सरकारने आता महानगरपालिका मुंबई वगळता निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणल्यामुळे विरोधकांनीही राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
महानगरपालिकांच्या निवडणुका २०२२ मध्ये घोषित होण्याची शक्यता आहे.
यामध्ये एकूण १५ महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी,
नगरपचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी याबाबत राज्यमंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि हा निर्णय घेण्यात आला.
वाचा : चुक Poonawala च्या कर्मचाऱ्यांची व भोगाव लागतय नागरिक व Swach कर्मचाऱ्यांना.