सजग नागरिक टाइम्स:
कोंढवा: अनैतिक संबंधातून महिलेसह दोन चिरमुड्याचा खून करून त्यांचे मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याने राज्यात खळबळ उडाली होती.
दि.५ एप्रिल रोजी धर्मावत पेट्रोल पंपाचे मागील बाजूस महात्मा फुले शाळेजवळ तीन मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
सदर ठिकाणी महिलेचे ओळखपत्र मिळून आले त्यावरून तीचे नाव आम्रपाली रमेश वाघमारे, (वय २४ वर्षे) असे असल्याचे समजले. तसेच खोलीतील शाळेच्या पुस्तकांवरून बालकांची नावे आदित्य वय ०४ वर्षे व मुलगी नामे कु. रोशनी, वय ०६ वर्षे अशी माहिती मिळाली. यावेळी आरोपी वैभव रुपसेन वाघमारे याचा मोबाईल नंबर मिळून आला.
आरोपीबाबत अधिक चौकशी केली असता सदर इसम मयत महिला नामे आम्रपाली रमेश वाघमारे हिच्या बरोबर रहात असल्याची माहिती प्राप्त झाली. आरोपी इसमाचे प्राप्त मोबाईल नंबर वरून पोलीस हवालदार / ७९ निलेश देसाई यांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे आरोपीची माहिती घेतली असता तो हांडेवाडी चौक पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास हांडेवाडी चौक येथून गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हें संजय मोगले व पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोहवा / सतिश चव्हाण, पोहवा / निलेश देसाई, पोना / गोरखनाथ चिनके पोना / जोतिबा पवार, पो. अं. / सुजित मदन, पो. अं. / संतोष बनसुडे, पो. अं. / लक्ष्मण होळकर, पो.अं./ सागर भोसले व पो. अं. / सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.