ताज्या घडामोडी

रेशनिंग दुकानातील धान्य काळाबाजारत विकणारी टोळी गजाआड.

Advertisement

खडक पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी
Sajag Nagrikk Times: या महागाईच्या काळात नागरिकांना उदरनिर्वाहासाठी थोडीफार मदत व्हावी म्हणून सरकार त्यांना स्वस्तात ध्यान देत असते ,पण त्यांच्याच हक्काच्या धान्यावर काळाबाजार करणारे रेशनिंग माफिया काळाबाजारू तसेच रेशनिंग अधिकारी वर्ग हे डोळा ठेवून असतात .

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळेच काळाबाजार वाढला आहे .अशा काळाबाजारू दुकानदारांवर आळा घालण्यासाठी पोलीस विभाग सक्रिय झाले आहे.

असाच एक काळाबाजार करणाऱ्यांचा प्रकार खडक पोलिसांनी उघडकीस आणला आहे अधिक माहिती पुढील प्रमाणे.

काशीवाडी भागातील राजीव गांधी सोसायटी जवळ सार्वजनिक रोडवर दिनांक ११/०४/२०२३ रोजी३,००,००० / – रु.कि.चा एक क्रिम रंगाचा अशोक लेलंड कंपनीचा मालवाहतुक टेम्पो त्याचा क्र . MH – 12 , PQ – 0582 ,

४०,५०० / -रुकिचा तांदळाने भरलेल्या ५४ पांढरे रंगाच्या नायलॉनच्या पिशव्या प्रत्येकी ५० किलो वजन एकुन २७,०० किलो ( प्रतिकिलो १५ रु प्रमाणे )

Advertisement

यांतील आरोपी १ ) जावेद लालु शेख , वय – ३५ वर्षे , धंदा मस्जीद मागे , काशेवाडी , भवानी पेठ , पुणे भंगार खरेदी विक्री , रा . अंजुमन २ ) अब्बास अब्दुल सरकावस , वय- ३४ वर्षे , धंदा- ड्रायव्हर , रा . घर नं . ६५ , अशोकनगर कॉलणी , काशेवाडी भवानी पेठ , पुणे ३ ) इम्राण अब्दुल शेख , वय- ३० वर्षे , रा . आप्पा मोहीतेंच्या शेजारी , गोल्डन ज्युबली काशेवाडी , भवानी पेठ , पुणे.

क्र . ०१ ते ०३ यांनी वेगवेगळ्या रेशनिंग दुकानदारांकडुन माल काळ्या बाजारात विकत घेवुन एकत्र करुन तो मालवाहतुक टेम्पो MH – 12 , PQ – 0582 यामध्ये भरुन सदरचा माल मौजे केडगाव , ता . दौंड , जि . पुणे येथे बाजारात बेकायदेशिररित्या विक्रीकरीता घेवुन जात असतांना मिळुन आले . म्हणुन फिर्यादी महेश जाधव यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कामगिरी खडक पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे

सदरील कामगिरी १. श्रीमती संगीता यादव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , खडक पो स्टे पुणे . संपतराव राऊत , पोलीस निरीक्षक गुन्हे , खडक पो स्टे पुणे.श्री नितीनकुमार नाईक , सहा पोलीस निरीक्षक खडक पो स्टे पुणे ,नितीनकुमार नाईक , सहा पोलीस निरीक्षक , खडक पोलीस ठाणे ,एच.एम. काळे सहा . पोलीस निरीक्षक खडक पोलीस ठाणे.

Share Now