आज प्रजासत्ताक दिनानिमित्त व तसेच CAA NRC विरोधात पुण्यातील गोळीबार मैदान येथे सार्वजनिक दुआ

Republic day 2020 : इनक्रेडिबल गृप तर्फे संविधान वाचून व संविधानाची शपथ घेऊन सत्याग्रह करण्यात आले

caa-nrc-npr-against-muslim-community-dua-in-republic-day-2020

Republic day 2020 : सजग नागरिक टाइम्स : आज दिनांक 26/1/2020 रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त  व  तसेच CAA NRC विरोधात पुण्यातील गोळीबार मैदान येथे सार्वजनिक दुआ (प्राथना )चे आयोजन करण्यात आले होते.

यात भारत देशाच्या उन्नतिसाठी ,सुख समृद्धि साठी व् तसेच CAA NRC NPR मुळे भारत वासियांना होणाऱ्या त्रासापासून त्यांचे संरक्षण व्हावे

व् सर्व भारतीयांची या कायद्यातुन सुटका व्हावी म्हणून प्रार्थना करण्यात आली.

यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपिस्थत होते .सदरिल प्रार्थना ही मौलाना अय्यूब अशरफी यानी केली तर याचे आयोजन सीरत कमिटी ने केले.

caa-nrc-npr-against-muslim-community-dua-in-republic-day-2020

तसेच CAA NRC NPR विरोधात कोंढ़व्यातील सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान हे सात दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्याग्रह आंदोलन करत आहे.

आज दिनांक 26/1/2020 रोजी सत्याग्रहाच्या  सातव्या  दिवशी  संविधान वाचून , व संविधानाची शपथ घेऊन आजचे सत्याग्रह करण्यात आले. 

यावेळी इनक्रेडिबल गृपचे असलम इसाक बागवान , साबिर सय्यद, आयुबभाई रोटवाले, साजिद शेख, शानु पठाण, साहिल मणियार, राजु शेख , महेश बहिरट, 

नितिन दुर्गा , भगवान हडके, डॉ आदिल आत्तार , अनिल इंगळे, निसार खान , दिलीप कुलकर्णी, आयशा फरास, व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरील  सत्याग्रह आभियानास उत्सफुर्त  प्रतिसाद मिळत असून सदरचे सत्याग्रह हे बेमुदत असल्याचे असलम इसाक बागवान यांनी सांगितले.

caa-nrc-npr-against-muslim-community-dua-in-republic-day-2020

तसेच आज कोंढव्यातील शाहीन बाग या ठिकाणी हि ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

caa-nrc-npr-against-muslim-community-dua-in-republic-day-2020

One thought on “आज प्रजासत्ताक दिनानिमित्त व तसेच CAA NRC विरोधात पुण्यातील गोळीबार मैदान येथे सार्वजनिक दुआ

Comments are closed.