(online controversy) विहित मुदतीत रेशनकार्ड न मिळाल्याने लोकसेवा आयोगाकडे तक्रार दाखल.
सजग नागरिक टाईम्स इम्पॅक्ट ग" परिमंडळ विभागातील यंत्रणा खळबळून जागे होत तत्परतेने तयार करून दिले रेशनकार्ड.
(online controversy) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :
पुणे शहरातील अन्नधान्य ग”परिमंडळ कार्यालयातून नियमानुसार विहित मुदतीत (ration card) रेशनकार्ड नागरिकांना मिळत नसल्याचे सजग नागरिक टाईम्सनेउघडकीस आनले होते.
सदरील प्रकरण उघडकीस येताच ग” परिमंडळ कार्यालयातील यंत्रणा खळबळून जागे झाली ,
व भेटत नसलेल्या अर्जाची शोधाशोध करून दुसऱ्याच दिवशी (ration card) रेशनकार्ड तयार करून नागरिकाच्या हाती दिल्याची माहिती मिळाली .
हकीकत अशी की अन्न धान्य ग” परिमंडळ विभागातील कामाकाज कासवाच्या गतीने चालत असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता.
रेशनकार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना दोन-दोन महिने हेलपाटे मारावे लागत होते.
तर काही रेशनकार्ड मिळण्यासाठी जमा झालेले अर्जच गायब झाले होते,
त्याचा जाब नागरिकांनी विचारला असता सदरील विभागातील सर्व कर्मचारी एकमेकांवर ढकलून हाथ झटकत होते.
तर काही (ration card) रेशनकार्ड ऑनलाइनच्या कचाट्यात अडकले होते.
परंतु अधिकारी त्यावर निर्णयच घेत नसल्याने दोन-दोन महिने रेशनकार्ड पडून राहिल्याचे सूत्रांनी माहिती दिली .
ऑनलाईन शिवाय रेशनकार्ड नागरिकांना वितरीत करणार नसल्याचा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतल्याने नागरिकांची कुंचबना झाली होती.
वाचा : रेशनिंग कार्यालयातील रेशनिंग कार्डाचे काम अडकले ऑनलाईनच्या कचाट्यात !
नागरिकांनी सजग प्रतिनिधीकडे तक्रारीचा पाढा वाचला असताना सजगने अधिक माहिती घेऊन सदरील प्रकरण उघडकीस आनले,
त्याची दखल घेत दुसऱ्याच दिवशी रेशनकार्ड तयार करून नागरिकाच्या हाती देण्यात आले.
हेच काम या अगोदर तत्परतेने करून दिले असते तर नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळच आली नसती.
आडमुठ्या धोरणामुळे कामे पेंडिंग पडत आहेत यावर वरिष्ठांनी नजर ठेवणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
सजगमुळे रेशनकार्ड मिळाल्याने नागरिकांनी सजग नागरिक टाईम्सचे आभार मानले.
वाचा : पुण्यातील रेशनिंग दुकानदारांकडून शासन परिपत्रकाला केराची टोपली.!