Homeताज्या घडामोडी54 लोकांविरुद्ध तक्रार दाखल करून व मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून मोकाट फिरनारा...

54 लोकांविरुद्ध तक्रार दाखल करून व मुस्लिमांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून मोकाट फिरनारा समाजकंटक अॅड प्रदीप गावडे वर गुन्हा दाखल

(Ad pradip gawade) अॅड प्रदीप गावडे चे ट्विटर अकाउंट पाहिले असता वर्षभरात त्याने दोन समाजात तेढ निर्माण होईल अश्या अनेक पोस्ट टाकल्याचे आढळले .

त्यात (Ad pradip gawade) ने ख्वाजा गरीब नवाज, पैगंबर साहेब ,मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब,

शरद पवार साहेब व इतर बऱ्याच नेत्यांविरोधात अनेक पोस्ट टाकून हिंदू ,मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचे प्रयत्न केलेले दिसते .

सुदैवाने तसे काही झाले नाही हे महाराष्ट्राचे नशीब .

याच्या पोस्टवर कोणी कारवाई करत नसल्याने द्वेष पसरवण्यात सराईत झालेला गावडे हा बेफाम होऊन अधिक आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट टाकू लागला ,

या गावडेने २२ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाला टार्गेट करून व त्यांच्या पैगंबर साहेबांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन लिखाण केले.

सदरील पोस्ट अजहर खान यांच्या निदर्शनात येताच त्यानी त्याचे ट्विटर अकाउंट पहिले,

तेव्हा त्यात त्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब व इतर नेत्यांविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह भाषेत

अनेक पोस्ट टाकून हिंदू ,मुस्लीम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचे प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले.

या बद्दल क्षणाचाही विलंब न करता अजहर खान यांनी ऍड. समीर शेख व ऍड. सुफियान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री,गृहमंत्री,

पुणे पोलीस आयुक्त ,सायबर पोलीस यांना तत्काळ इमेल द्वारे तक्रार केली .व सायबर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली.

अजहर खान यांच्या फिर्यादी नुसार त्या प्रदीप गावडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप गावडे हा व्यवसायाने वकील असून कायद्याचे त्याला चांगले ज्ञान आहे ,

याचाच गैरफायदा उठवून कोणी आपले काही बिघडवू शकत नसल्याचे समजत कदाचित तो अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकत असावा ,

54 लोकांविरुद्ध तक्रार दाखल करून कायदा हा सर्वाना समान असल्याची पोस्ट टाकणारे प्रदीप गावडे हे विसरून गेले की कायदा हा सर्वाना खरंच समान असतो .

एखाद्याची तक्रार करत असतांना स्वतःचे हात देखील स्वच्छ असले पाहिजेत.

तुमच्या तक्रारीमुळे जर 54 लोकांवर पोलीस कारवाई होऊ शकते तर तेच पोलीस तुम्ही कायदा तोडला तर तुमच्यावरही गुन्हा दाखल करू शकतात .

ऍड समीर शेख, ऍड सुफियान शेख यांच्या सहकार्याने अजहर खान यांनी रीतसर फिर्याद दिली.

सदर फिर्यादी नुसार त्या प्रदीप गावडेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular