Homeताज्या घडामोडीरेशनिंग कार्यालयातील रेशनिंग कार्डाचे काम अडकले ऑनलाईनच्या कचाट्यात!

रेशनिंग कार्यालयातील रेशनिंग कार्डाचे काम अडकले ऑनलाईनच्या कचाट्यात!

(Ration office)दोन-दोन महिने काम होत नसल्याने नागरिकांना माराव्या लागतात हेलपाटे.

(Ration office) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :

पुणे शहरातील काही रेशनिंग कार्यालयातील अधिकारी हे आपल्या मनमर्जी पणे कामे करत असल्याचे अनेकदा सजग नागरिक टाईम्सने उघडकीस आणून नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.

नागरिकांना वेळेवर रेशनकार्ड मिळण्यासाठी शासनाने अनेक परिपत्रक काढून नागरिकांची कुंचुबना होणार नाही यासाठी पाऊले उचलली आहेत.

परंतु काही अधिकारी स्वत:च्या बुद्धीचा वापर न करता वरिष्ठांच्या लेखी आदेशाची वाट बघत नागरिकांना वेठीस धरत आहे.

असाच एक प्रकार अन्नधान्य ग” परिमंडळ कार्यालयात सुरू आहे.

वाचा : पुण्यातील रेशनिंग दुकानदारांकडून शासन परिपत्रकाला केराची टोपली.!

नागरिकांनी रेशनकार्ड मिळण्यासाठी अर्ज केल्यानंतर लोकसेवा हमी कायद्या अन्वये ३० दिवसांत रेशनकार्ड देणे बंधनकारक आहे.

परंतु ग” परिमंडळ कार्यालयात दोन-तीन महिने कार्ड मिळत नसल्याचे निर्दशनास आले आहे.

या बद्दल माहिती घेतली असता ग” परिमंडळ कार्यालयात रेशनकार्ड ऑनलाईन नोंदणी शिवाय दिले जात नसल्याचे सांगण्यात येते, सध्या ऑनलाईन सिस्टीम वर error येत असल्याचे सांगितले जात आहे.

Ration-card-in-the-ration-office-is-stuck-in-the-online-controversy

परंतु सिस्टीमवर error येत असेल तर किती दिवसात रेशनकार्ड द्यावे या बाबतीत अधिका-यांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही.

असे error वर्षभर येत राहिले तर वर्षभर रेशन कार्ड नागरिकांना देणार नाही का ? असा प्रश्न उपस्थित होतआहे.

नागरिकांना रोज ग” परिमंडळ कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असले तरी कार्यालयातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्याचे घेणे देणे नसल्याचे दिसते.

फक्त ग” परिमंडळ कार्यालय वगळता बाकिच्या इतर परिमंडळ कार्यालयात सध्या ऑफलाईन पध्दतीने रेशनकार्ड दिली जात आहे.

त्या मागचा कारण म्हणजे नागरिकांची गैरसोय होऊ नये.

अणि विषेश म्हणजे रेशनकार्ड अर्ज पेंडिंग संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे कळविणे आवश्यक आहे तर ऑनलाईन सिस्टीमवर error बाबतीत वरिष्ठांना पत्र व्यवहार करण्याचा देखील विसर पडला आहे.

ग परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांना रेशनिंग कार्ड पेंडिंग अर्जा संदर्भात माहिती मागितली असता ते देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अधिका-यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

सदरील प्रकरणात पुरवठा उपायुक्त डॉ त्रीगुन कुलकर्णी यांनी लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे.

या संदर्भात अधिक माहितीसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

अर्ज शोधण्यासाठी सर्व कर्मचारी लागले कामाला ?

रेशनकार्ड मिळविण्यासाठी नागरिकांना दोन तीन महीने तारेवरची कसरत करावी लागत असल्याने काही नागरिकांनी सजग प्रतिनिधीच्या निर्दशनास आणुन दिले, अर्जानुसार कार्ड ३० दिवसांत देणे बंधनकारक असताना ३ महिन्यांचा कालावधी होत आला तरी का दिले नाही असे प्रश्न विचारले असता सर्व कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे अर्ज पेंडिंग नसल्याचा पवित्रा घेतला. परंतु सजग प्रतिनिधीने पुरावे दाखवले असता तो अर्ज शोधण्यासाठी कार्यालयातील सर्व यंत्रणा कामाला लागली होती परंतु दीड-दोन तास शोधूनही अर्ज मिळाले नाही. या बाबतीत अधिका-यांना गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे.

रेशनकार्डाचे कामकाज अडकले ऑनलाइनच्या कचाट्यात ,

याबाबत ग” परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने यांना विचारणा केली असता ऑफलाईन रेशनकार्ड देण्यात यावे असे वरिष्ठांनी लेखी आदेश दिलेले नाही वरिष्ठांचे लेखी पत्र आल्यावरच ऑफलाईन पध्दतीने रेशनकार्ड देण्याचा विचार केला जाईल असे लक्ष्मण माने म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular