Homeताज्या घडामोडीशिक्षक दिना निमित्त जकिया खानम सहित अनेक शिक्षक,विद्यार्थी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण पुरुस्काराने...

शिक्षक दिना निमित्त जकिया खानम सहित अनेक शिक्षक,विद्यार्थी डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण पुरुस्काराने सन्मानित.

Sajag nagrik times : पुणे: सालाबाद प्रमाणे या वर्षी हि भारतरत्न मौलाना आझाद सोशल, एडजुकेशन,

अँड स्पोर्ट्स अस्सोसिएशन तर्फे शिक्षक दिना निमित्त पुणे तसेच महाराष्ट्रतील प्राध्यापक, प्रोफेसर ,शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ ,१० वी व १२ वीतील गुणवंत विध्यार्थी यांचे सत्कार करण्यात आले .

यावेळी जकिया खानम यांचा ही सत्कार करण्यात आला ,जकिया खानम या गेल्या 6 वर्षांपासून शिक्षकी पेशात असून जकिया खानम या सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. एनजीओ व एका राजकीय पक्षात राहून त्यांनी सामाजिक कार्य केले आहे.

सदर कार्यक्रमा चे अयोजन एसोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष मा अमानत शेख व सेक्रेटरी मा रफ़ीक़ तंबोळी यांनी वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे केले.

कार्यक्रमाची सुरवात संगीत रजनी ने करण्यात आली व उपस्थित सर्व मान्यवर व सत्कार मूर्तिनी याचा आनंद घेतला.

कार्यक्रमा चे अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठ चे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण होते.माजी आमदार महादेव बाबर, राष्ट्रवादी अल्पसंख्यक प्रदेश उपाद्य्क्ष इकराम खान,

माजी नगरसेविका हसीना इनामदार, मौलाना शबी हसन काज़मी, छावा स्वराज्य सेने चे प्रदेश अध्यक्ष मा आरिफ शेख ,

औरंगाबाद येथून अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना चे अध्यक्ष व उर्दू साहित्यिक इलाजुद्दीन फारूकी हे प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमा मध्ये मौलाना आज़ाद विचार मंच चे अध्यक्ष मिर्जा अहमद बेग, मोहम्मदी भाई, इकबाल भाई यांचे सह विविध शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, नॉन टीचिग स्टाफ इयत्ता १०,१२वी चे गुणवंत विद्यार्थि त्यांच्या पालकसह मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुबारक जमादार सर, के विजयराव सर,आदम सय्यद,नजिर शेख, आसिफ मेमन, अनवर शेख,

इमरान शेख, अली शेख, राजू खान,परवीन शेख आदिनी परिश्रम घेतले.

कार्यक्रम चे सूत्र संचालन इकबाल अंसारी व नज़रीन इंजनर यांनी केले तर आभार एसोसिएशन चे जनरल सेक्रेटरी रफ़ीक़ तंबोळी यांनी मांडले.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular