Police Newsताज्या घडामोडी

हिंदू राष्ट्रसेनेच्या तुषार हंबीरवर ससून रुग्णालयात हल्ला

Advertisement

पुणे : तुषार हंबीर याच्यावर सोमवारी रात्री ससून रुग्णालयात शिरून ५ जणांच्या टोळक्याने बंदुकीतून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला . तो फसल्यानंतर त्यांनी धारदार हत्यारांनी हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता .

हंबीरवर हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आता बंडगार्डन पोलिसांची २ पथके , हडपसर पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखेची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत .

Advertisement

या हल्ल्यातील तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत . त्याआधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे . या प्रकरणी बाळा ओव्हळ ,सागर ओव्हाळ , इनामदार असे तीन संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत .

याबाबत तुषार नामदेवराव हंबीर ( वय ३५ , स . गोंधळेनगर , हडपसर ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

अधिक माहितीनुसार , गुंड तुषार हंबीर हा हिंदू राष्ट्र सेनेचे काम करत असून तो लोणी काळभोर पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मोक्काच्या गुन्ह्यात आरोपी आहेत .

त्याला हाडांचा त्रास असल्याने वारंवार ससूनमध्ये येत होता.

Share Now