HomePolice Newsरात्रभर चालणारे पब , हॉटेल , हुक्का पार्लर'ने गुन्हेगारी वाढली!

रात्रभर चालणारे पब , हॉटेल , हुक्का पार्लर’ने गुन्हेगारी वाढली!

पुणे शहर आणि उपनगरांच्या भागात रात्रभर चालणारे पब , हॉटेल , हुक्का पार्लर यांची जोरदार चलती आहे . मुंबईतून काही लोक नाईट लाईफचा आनंद घेण्यासाठी पुण्यात येतात .

पुण्याच्या नाईट लाइफची चर्चा राज्यभरात आहे . या नाईट लाइफमध्ये अमली पदार्थांचा वापर वाढल्याने गुन्हेगारी वाढली आहे .

त्यामुळे या नाईट लाइफवर तातडीने निर्बंध आणावेत , अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांनी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे केली आहे .

वेळीच या मागणीची दखल घेऊन कारवाई होण्याची अपेक्षाही नागरिकांकडून पदाधिकाऱ्यांसह व्यक्त केली जात आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular