देवेंद् फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यात स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्यावर वाद सुरु असतानाच पिंपरी चिंचवड शहरात देखील तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हे हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून दंगली घडवू पाहत असल्याचे पत्र पिंपरी चिंचवड एम आय एम महिला शहराध्यक्ष रूहीनाज शेख यांनी पिपरी पोलिसांना दिले.
पिंपरी चिंचवड येथील डीमार्ट समोरील जुना पुणे मुंबई हायवेवरील चौकाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हजरत टिपू सुलतान असे नाव दिले आहे.
परंतु टिपू सुलतान हे क्रूर कलंकित शासक होते असे तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून हा महानगरपालिकेने लावलेला बोर्ड काढून टाकण्याची या संघटना मागणी करत आहेत.
तरी सामाजिक सलोखा बिघडवू पाहणा-या व धार्मिक तेढ वाढवून दंगली घडवू पाहणा-या विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांना अटकाव करावा व शहराचे सामाजिक वातावरण खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी,
अश्या आशयाचे निवेदन पिंपरी चिंचवड AIMIM पक्षाच्या वतीने पोलीस उपायुक्त व पिंपरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना भेटून निवेदन देण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे,जेष्ठ सदस्य शब्बीर शेख,महिला शहराध्यक्ष रूहीनाज शेख,महासचिव शबाब इनामदार,खैरूनिस्सा शेख उपस्थित होते.