ताज्या घडामोडी

बिल तर निघाले पण कामाचे काय?

Advertisement

Sajag Nagrik Times : पुणे मनपा आयुक्तांनी 17 मार्च पर्यंत कामे पूर्ण करून 25 मार्च पर्यंत बिल सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्या अनुषंगाने अनेकांनी त्यांची बिले सादर केली परंतु प्रभाग क्रमांक 18 मध्ये बिले तर सादर झाली पण काम अपूर्णच तो आजता गायत,

प्रभाग क्रमांक 18 ‘अ ‘ महात्मा फुले स्मारक जवळ 18इंच व्यासाचे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात आले .
ते काम 17 मार्च या तारखेपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन होती ,परंतु संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यांसोबत मिळून काम पूर्ण होण्याअगोदरच बिले सादर केली असल्याने काम पुर्ण न करता रस्त्यावर खडडे पडलेले आहे , याचा त्रास ये जा करणार्या हजारो नगरिकांना भोगावा लागत आहे.

तसेच 22एप्रिल रोजी मार्कंडेय मंदिर समोरिल ड्रेनेजचे काम करत असताना त्या कामगारांना सुरक्षेचे साधन उपलब्ध करून न देता 7 फुट खोल असलेल्या खड्यात उतरविण्यात आले व फक्त एका चेंबर चे काम करण्यात आले.

Advertisement

इस्टिमेट नुसार व वर्क ऑर्डर नुसार 22एप्रिल या तारखेपर्यंत काम पूर्ण झालेले नाही , याचा त्रास सदरील नागरिकांना भोगावा लागत आहे .

तसेच 567 गंज पेठेतील विकट सहकारी गृहरचना समोरील रस्त्यावर डेनेज लाईन टाकण्याचे काम करण्यात आले. परंतु त्याचे खड्डे ते आजतागायत बुजविण्यात आले नसल्याने संबंधित कामामुळे अनेकांना या खड्याचा त्रास भोगावा लागत आहे.

सदरिल प्रभागातील सर्व कामांची थर्ड पार्टी समिती द्वारे चौकशी करण्याची मागणी होत असुन,

सदरील ठिकाणी काम करणाऱा ठेकेदार संदिप धोत्रे विरोधात कडक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

भाग 1

प्रभाग क्रमांक 18 मध्ये खाजगी जागेतच कामे जास्त!

Share Now