ताज्या घडामोडीपुणे

अॅड.वाजेद खान हे खडकी समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

Advertisement

(Ad.Wajed Khan)एस.टी ड्रायव्हरचा मुलगा ते खडकी भुषण पुरस्कार विजेता अॅड. वाजेद खान बिडकर यांचा प्रवास आश्र्चयचकित करणारा: देवसिंग गिल

(Ad.Wajed Khan) सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधी :

मराठी चित्रपट सृष्टीत कायदेशीर सल्लागार म्हणून काम करणाऱे अॅड वाजेद खान यांना नुकताच खडकी समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इंदिरा कल्याण केंद्रातर्फे दक्षिणात्य कलाकार देव गिल यांच्या हस्ते 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण व पुणे शहरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडकी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

उल्लेखनीय कार्य करणारे एडवोकेट वाजेद खान बिडकर ,सागर आव्हाड गणेश देवराम कांबळे, अफजल खान, दीलीप दहाडे,

अमोल सहारे ,अनिल जाधव, शेखर गायकवाड ,कालिंदर शेख ,आफताब शेख ,अंजुम इनामदार ,

Advertisement

नईम शेख आणि अनेक मान्यवरांचा सत्कार देवगिल यांच्या हस्ते, इंदिरा कल्याण केंद्राच्या वतीने करण्यात आला.

या प्रसंगी देव गिल यांनी एस.टी ड्रायव्हरचा मुलगा ते खडकी भुषण पुरस्कार पर्यंत मजल मारणा-या अॅड. वाजेद खान यांचा प्रवास आश्र्चयचकित करणारा असल्याचे वकतव्य केले.

यावेळी प्रमुख पाहणे म्हणून कर्नल अनिल पलांडे, आर्या घारे, पोलीस निरीक्षक अनिल पवार, लहुजी सेनेचे संस्थापक शंकरराव तडाखे,

सचिन तायडे, इंदिरा कल्याण केंद्राचे संस्थापक अजहर खान, अध्यक्ष अमिर चौधरी, जाफर चौधरी,

खडकी कॅन्टोनमेंटचे माजी सदस्य मनिष आनंद, पुजा आनंद, मगदुम पिरजादे, फिरोज शेख, जहिर शेख,

सय्यद हलीम, हसन सय्यद, मुखत्यार कुरेशी, मगदुम खान, अमिर कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share Now