(Sayyadnagar) महिलांनी धुमाकूळ घालणा-यां विरोधात कारवाईसाठी दिला उपोषणाचा इशारा.
वानवडी पोलिसांनी केले गुन्हे दाखल
(Sayyadnagar) सजग नागरिक टाइम्स : पुणे :
सोमवारी रात्री 9.00 च्या सुमारास सय्यदनगर गल्ली नं 12 A जवळील मैदानात दोन गटात भांडने झाली.
व ती भांडणे रस्त्यावर येऊन गल्ली नंबर 11 अ व 12 अ मधील नागरिकांना डोके दुखी ठरली.
मागिल दोन दिवसांपासुन ही भांडने चालू होती ती न थांबल्याने सोमवारी त्याचे रुपांतर तोडफोडीत झाले
भांडने दुसऱ्यांची पण सापडला मात्र मुजिफ तांबोळी अशी माहीती नागरिकांनी दिली.
या भांडणात तलवारी कोयते नाचवत वाहनांची तोडफोड करत चांगलाच नंगानाच करण्यात आला.
सय्यदनगर परिसरात काही जणांनी महिला व लहान मुलांना मारहाण केली तर मुजिफ तांबोळी या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे.
त्याच्यावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले आणि
त्याच्याजवळ असलेले 27 हजाराची रक्कमही या टोळक्याने लुटली असल्याचे आरोप या तरुणाने केले आहे.
स्थानिक नागरिक व महिला या घटनेमुळे चांगलेच भयभीत झाले असून
सर्वांना जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ आली असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे.
लहान मुले,वृद्ध महिलांना मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
गुन्हेगारांना शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु निषपाप तरुणांवर कारवाई होता कामा नये असे मत ही नागरिकांनी व्यक्त केले.
या संदर्भात महंमदवाडी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाडकर यांनी सांगितले
की गुन्हा नोंदवला असून पोलीस योग्य ती कारवाई करत आहे.
वाचा : कॅम्प येथील वेसटन थेटर शेजारील लोखंडी बस स्टॉप पडुन दोन जन जखमी.