डी एस के व हेमंती कुलकर्णी विरोधात आणखीन ५२ तक्रारी दाखल.

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

सजग नागरिक टाइम्स : मजहर खान पुणे ; डी एस के ग्रुप ऑफ कंपनीचे दीपक सखाराम कुलकर्णी व हेमंती दीपक कुलकर्णी यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे भा द वी कलम ४०६,४२०,३४,महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे अधिनियम १९९९ कलम ३,४ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहे ,यासंदर्भात फिर्याद दाखल झाल्यापासून तक्रारदार दिवसेंदिवस वाढतच आहे.

Advertisement


आज २/११/२०१७ रोजी आणखीन ५२ जणांनी तक्रार नोंदवल्याने मागील २९८ मिळून ३५१ जनाची तक्रार नोंद झाली आहे, यातून अंदाजे १२ कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे मिलिंद पाटील यांच्या देखरेखी खाली एक तपास कक्ष तयार करण्यात आले असून तपास वेगाने व्हावे म्हणून त्यात ५ पोलीस निरीक्षक,४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी ,व २० पोलीस कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे ,सदरील कक्ष आर्थिक गुन्हे शाखा संगम ब्रिज पुणे येथे कार्यरत असून सकाळी १०.ते सायंकाळी ५.३० पर्यंत नागरिक तक्रार नोंदवू शकतात यासाठी एक हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहे. ०२०-२५५४००७७ ,प्रदीप देशपांडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे व  पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे शाखा ,सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शन खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा संजय कुरुंदकर  हे तपास करत आहे.

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल