मुलीचा बाप उपनिरीक्षक तर आई गुन्हे अन्वेशन विभागात यांनाच पोलिसांनी दाखवले हद्दीचे वाद
सजग नागरिक टाइम्स : पोलिसाच्या मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराने मध्यप्रदेश हादरले आहे ,हि धक्कादायक घटना पोलीस ठाण्यापासून १०० मीटर अंतरावर घडली , पोलिसांच्या माहितीनुसार मुलीचा बाप उपनिरीक्षक तर आई गुन्हे अन्वेशन विभागात नोकरी करत आहे.१९ वर्षीय मुलगी हि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे.
ती मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास क्लासवरून घरी परतत असताना तिला आरोपी गोलू बिहारी चाधर व त्याचा साथीदार अमर घुन्तु याने तिचा हात धरत फरफटत जवळील नाल्यामध्ये नेले तेथे तिच्यावर बलात्कार केले, गोलू हा गुटखा व सिगरेट आनण्यासाठी गेला असता त्याला राजेश व रमेश हे मित्र भेटले गोलुने त्यांना हि सोबत आणले व त्या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केले,हे चौघे सिगरेट व चहासाठी ब्रेक घेत घेत तिच्यावर बलात्कार करत होते.घटने नंतर ती तरुणी कशीबशी पोलीस चोकीत पोहोचली व तिने तिच्या पालकांना फोन करून बोलाऊन घेतले तिची अवस्था पाहून त्यांनी तिला घरी नेले .दुसऱ्याच दिवशी सकाळी एम पी नगर पोलीस ठाणे गाठले तेथील पोलिसांनी त्यांना हद्दीचा वाद घालत हबीबगंज पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले .हबीबगंज पोलिसांनी त्यांची थट्टा उडवत टाळाटाळ केल्याने त्या पालकांना पोलीस उपमहानिरिक्षकाशी संपर्क करून गुन्हे दाखल करावे लागले. हि अवस्था जर पोलिसांच्याच बाबतीत घडत असेल तर तेथील सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहत असतील अशी खदखद नागरिकांमध्ये आहे.