Homeताज्या घडामोडीchild kidnaping:बालीकेस पळवणा-या युवकाला तीन दिवस पोलीस कोठडी

child kidnaping:बालीकेस पळवणा-या युवकाला तीन दिवस पोलीस कोठडी

child kidnaping Case:नांदेड , एका साडेसात वर्षीय बालिकेला वाईट उद्देशाने पळवून नेणाऱ्याला नागरिकांनी पोलिसाच्या हवाली केले आहे. 

three-days-police-custody-for-child-kidnaping

आज दि.12 मे रोजी जिल्हा न्यायाधीश जी.ओ.अग्रवाल यांनी बालिकेला पळवून नेणाऱ्या युवकाला 15 मे पर्यंत पोलीस कोठडी सूनावली आहे.

अधिक माहिती अशी आहे की डिमार्ट जवळच्या रस्त्यावर एका बालिकेची मावशी त्या बालिकेला आणि तिच्या भावाला घेवून आली होती.

ती मावशी बालकाला स्कुटी चालविणे शिकवित होती. त्यामुळे साडेसात वर्षीय अल्पवयीन बालिका रस्त्याच्या कोपऱ्यावर बसली होती.

 

तेवढ्यात एक युवक तेथे आला आणि त्याने त्या बालिकेला चल तुझ्या घरी सोडतो असे म्हणून गाडीवर बसविले.आणि गाडी डीमार्टच्या पुढे नेली.

त्या बालिकेने माझे घर इकडे नाही असे सांगितले.पण त्या युवकाने तिचे काहीच न ऐकता गाडी पुढे नेली

आणि त्या बाजूने जाणाऱ्या कॅनॉलजवळ उभी करुन त्या बालिकेला कॅनालमध्ये ढकलून दिले. ती बालिका कॅनालमधून स्वतः वर आली.

हिंदी बातमी वाचण्यासाठी sanata news .com वर क्लिक करा 

त्या बालिकेला घेवून जाण्याची घटना तिच्या मावशीने पाहिली होती. पण तिने पाठलाग करण्याऐवजी ही माहिती भाग्यनगर पोलिसांना दिली.

भाग्यनगर पोलिसांच्या सर्वच गाड्या त्वरित कार्यान्वित झाल्या आणि तिकडे निघाल्या.

तिकडे कॅनालमधून वर आलेल्या बालिकेने एका मोटारसायकल चालकाला थांबवून आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली तेंव्हा त्या मोटारसायकल चालकाने तिला आपल्या गाडीवर बसवून समोर असणाऱ्या पेट्रोल पंपावर आणले.

त्या बालिकेजवळ असलेला मोबाईल फोन गाडीच्या वेगात कुठेतरी पडला होता.

पण पेट्रोलपंपावर आल्यावर त्या बालिकेने सोबतच्या व्यक्तीला आपल्याला पळवून नेणारा युवक दाखविला.

तेथेच लोकांनी त्या युवकाला पकडले आणि त्या बालिकेसह त्या युवकाला घेवून पोलीस स्टेशनकडे निघाले. भाग्यनगरमधून निघालेल्या पोलिसांच्या गाड्या रस्त्यातच त्यांना भेटले.

पोलिसांनी युवक सोबत आणला आणि त्याची मोटारसायकलही आणली. रविकांत प्रल्हादराव पावडे (वय24) रा.पावडेवाडी नांदेड असे आरोपी चे नावआहे.

मोटारसायकल क्र.एमएच-26-एएम-4940 ही जप्त केली आहे.

three-days police custody for child kidnaping

त्या अल्पवयीन बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 363, 354 आणि लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

आपल्या प्रियजनांना  वाढदिवसाच्या शुभेछा  देण्यासाठी क्लिक करा 

पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना देण्यात आला.

दुपारी चंद्रकांत पवार आणि त्यांचे सहायक पोलीस कर्मचारी वैजनाथ पाटील यांनी रविकांत प्रल्हादराव पावडे

याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश जी.ओ. अग्रवाल यांनी याला दि.15 मेपर्यंत पोलीस कोठडी सूनावली.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular