आगामी महापालिका निवडणुकीत “एक वार्ड – एक नगरसेवक”

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

सजग नागरिक टाईम्स- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुक ही एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच हाेणार आहे.

राज्य निवडणुक आयाेगाने फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सर्व महापालिकांना वाॅर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहे.

पुणे महापालिकेची सदस्यसंख्या १७० च्या आसपास पाेचण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षभरापासून महापालिका निवडणुक एक सदस्य कि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने हाेणार याविषयी चर्चा रंगली हाेती.

Advertisement

महापालिकेच्या हद्दीत नव्याने गावे समाविष्ठ केल्यानंतर प्रभाग रचना बदलली जाणार हे स्पष्ट झाले हाेते,

परंतु प्रभाग किती सदस्यांचा असेल याविषयी मात्र उलट सुलट चर्चा सुरू हाेती.

महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांत याबाबत एकमत हाेत नव्हते.

अखेर पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या राज्यातील अठरा महापालिकांची निवडणुक एक सदस्यीय वाॅर्ड पद्धतीने करण्याचा निर्णय झाला.

Advertisement

त्यानुसार राज्य निवडणुक आयाेगाने महापालिकांना आदेश देत एक सदस्यीय वाॅर्ड रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.

मागील महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा वापर झाला हाेता.

याचा फायदा भाजपाला झाला, पुण्यात भाजपचे ९९ नगरसेवक निवडुन आले हाेते.

आता एक सदस्यीय वाॅर्ड पद्धतीने निवडणुक हाेणार असल्याने अनेक ठिकाणी राजकीय गणिते बदलतील.

Advertisement

सध्या महापालिकेतील सदस्य संख्या १६४ असुन, नव्याने तेवीस गावांचा समावेश झाला आहे. या गावांतील मतदारांचाही समावेश मतदार यादीत करावा लागेल.

Advertisement

तसेच २०११ च्या जणगणनेनुसार शहरांत ३३ लाखाच्या आसपास मतदार हाेते. २०२१ जणगणना अद्याप झालेली नाही.

सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असुन, त्यानुसार सदस्यांची संख्याही १७० च्या आसपास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीसाठी एकचा प्रभाग होणार की दोन चा प्रभाग होणार यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती

Advertisement

अखेर याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकचा प्रभाग असणार आहे हे स्पष्ट झाले आहे


पुणे महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे राज्य सरकारने विधिमंडळात एकचा प्रभाग असणार असा कायदा पारित केला होता

त्यानंतर 31 डिसेंबर 2019 रोजी पुणे-मुंबई महापालिकेसह राज्यातील 18 महापालिकेत एकचा प्रभाग असणार असे आदेश काढले होते

राज्य सरकारने एकचा प्रभाग केला असला तरी दोन चा प्रभाग होण्याची शक्यता असल्याची चर्चा गेली अनेक महिने सुरू होती

Advertisement

तसेच दोन चार प्रभाग पद्धतीने जास्त फायदेशीर असल्याचे मत अनेक नगरसेवकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांचे मत होते यासाठी विधिमंडळात कायद्यात बदल केले जातील असा अंदाज वर्तवला जात होता

या चर्चेला पूर्णविराम लागला आहे एकचा प्रभाग झाल्याने पक्षासह उमेदवारांच्या समितीचाही कस लागणार आहे

पुणे महापालिकेत यापूर्वी 2007 यास आली एक च्या प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती

महापालिकेचे निवडणूक अधिकारी अजित देशमुख म्हणाले शहरात एक चा प्रभाग एक सदस्य या पद्धतीने रचना केली आहे

Advertisement

निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पद्धतीने रचना केली जाईल यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागणार आहे.