Raj Thackeray latest speech Solapur:भाजपच्या जाहिरातीतील Harisal मधील मुलगा मनसे च्या स्टेजवर आणला
Raj Thackeray भाषण Solapur – सोलापूर: Bjpच्या तथाकथित Digital गावाचं खरं रुप दाखवत मनसे प्रमुख Raj Thackeray नी सरकारच्या दाव्याची चिरफाड केली आहे . भाजपानं हरिसाल गाव Digital झाल्याचा दावा केला होता. मात्र तो खोटा आहे, असं म्हणत Raj Thackeray यांनी हरिसाल गावाची सद्यस्थिती व्हिडीओसह उपस्थितांना दाखवली.
यावेळी तथाकथित Digital गावातील एका तरुणाला थेट मंचावर आणलं. Bjp नं अमरावतीमधल्या हरिसाल गावाची जाहिरात केली होती. त्यामध्ये हरिसाल गाव Digital झाल्याचं चित्र दाखवण्यात आलं होतं. गावात Internet असल्याचं, दुकानांवर Digital Payment होत असल्याचं भाजपाने जाहिरातीत दाखवलं होतं.
video पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा
मात्र Harisal गावातली खरी परिस्थिती वेगळीच असल्याचं मनसेनं दाखवलं. हरिसाल गावातल्या तरुणाला यावेळी Raj Thackeray यांनी मंचावर आणलं. ‘Harisal गावाच्या जाहिरातीत दिसलेला हा तरुण सध्या सगळीकडे नोकरीसाठी भटकतोय. काही मनसे कार्यकर्त्यांना पुण्यात हा तरुण भेटला आणि त्यानंतर तो माझ्या संपर्कात आला,’ असं राज यांनी सांगितलं आहे .
Harisal गावातील दुकानात Digital Payment होत असल्याचं भाजपानं जाहिरातीत दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्या दुकानात कोणतंही कार्ड स्वाईप मशीन नाही. याशिवाय कोणी paytm देखील वापरत नसल्याचं या तरुणानं मनसेनं चित्रीत केलेल्या व्हिडीओत सांगितलं. हरिसालला Digital villege म्हणून दाखवणारी भाजपाची जाहिरात ही प्रत्यक्ष जाऊन चित्रीत करण्यात आली नाही. तर ती दुसरीकडेच चित्रीत करण्यात आली, असंदेखील राज ठाकरेंनी सांगितलं आहे .
हिंदी बातम्यांसाठी क्लिक करा :sanata news.com
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हरिसालबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी हरिसाल हे Digital villege असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. Raj Thackeray हरिसालला गेलेलेच नाहीत. तुम्ही तुमच्या लोकांना पाठवून तिथली परिस्थिती बघा, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
मात्र त्या वृत्तवाहिनीलादेखील हरिसालमध्ये काहीच Digital दिसलेलं नाही. यावरुनही Raj Thackeray यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली. ‘Raj Thackeray हरिसालला गेलेच नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले. मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या. कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात?’, असा सवाल Raj Thackeray यांनी विचारला