ताज्या घडामोडीपुणे

माजी स्थायी समितिचे अध्यक्ष रशीद शेख यांच्याकडून अन्न धान्य वाटप..

Advertisement

Distribution of food grains : माजी स्थायी समितिचे अध्यक्ष रशीद शेख यांच्याकडून अन्न धान्य वाटप..

distribution-of-food-grains-by-former-standing-committee-chairman-rashid-shaikh

Distribution of food grains : सजग नागरिक टाईम्स , पुणे : जगभरात करोना व्हायरस ने थैमान घातले असून त्याचे लोन भारत भरात पसरले आहे.

त्यामुळे शासनाने २२ तारखेपासून लाॅकडाउन केले असल्याने पुणेकरांची व हातावर पोट असलेल्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

गरजुंचे हाल होउ नये म्हणून राजकीय व सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत .

माजी स्थायी समिती अध्यक्ष रशिद शेख व त्यांचे बंधूनी मदतीचा हात पुढे केला आहे. भवानी पेठ , काशेवाडी ,

लोहिया नगर हे भाग लोकदाटीचे असून अश्या वस्ती मध्ये मजदूरी करणारे आणि हातावर पोट असलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

Advertisement

मागील बातमी : पुण्यामध्ये काही तासातच पाच जणांचा मृत्यू

distribution-of-food-gras-pune-punby-former-standing-committee-chairman-Rashid-shaikh
पोलीसांना पाणी आणि जेवणाची सोय करताना माजी स्थायी समितिचे अध्यक्ष रशीद शेख

त्या वस्तीतील लोकांना राशनची आवश्यकता असल्याने रशिद शेख यांच्याकडून रोज गरजूंना अन्न धान्य वाटप केले जात आहे.

तर एवढ्यावरच न थांबता पोलीसांना हि पाणी आणि जेवणाची सोय केली जात आहे.

त्यात प्रभाग क्रमांक १९ चे नगरसेवक रफिक शेख , शफिक शेख व त्यांचे कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत ,

आणखीन काही मदत लागल्यास मी करण्यास तयार आहे अशी भावना रशिद शेख यांनी सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.

कोरोनाच्या लढ्यासाठी सरकारी यंत्रणेला मदत करा..

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे ते आपल्या भल्यासाठीच काम करत असून विनाकारण घरा बाहेर पडू नका असे आवाहन हि रशिद शेख यांनी केले आहे.

Sayyad Nagar ,Ramtekadi भागातील संशयित रुग्ण Negative निघाले

Share Now

One thought on “माजी स्थायी समितिचे अध्यक्ष रशीद शेख यांच्याकडून अन्न धान्य वाटप..

Comments are closed.