कोंढवा तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला

Talab Madrasa तील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला

the-missing-boy-of-kondhwa-talab-madrasa-went-come-home-safely

सजग नागरिक टाइम्स : Talab Madrasa : पुण्यातील कोंढवा तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना एका अल्पवयीन मुलास फूस लावून पळविण्यात आले असल्याबाबत

इजाज गौस शेख वय १५ वर्षे या अल्पवयीन मुलाच्या आईने कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली होती .

या सदराखाली सजग नागरिक टाइम्सने प्रेस नोट मिळाल्याने बातमी प्रसिद्ध केली होती .

सदरील मुलगा हा त्याच्या घरी परत आल्याने त्याची आई नावे रेश्मा शेख याने त्याला सविस्तर विचारपूस केली असता त्यास कोणीही पळवून नेले नसून वा  मदरसातून हाकलले नसून  तो स्वताहून मदरसातून पळून घरी आला असल्याचे सांगितले आहे,

या सर्व घडामोडीची माहिती रेश्मा शेख यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथे जावून सांगितले असल्याचे रेश्मा शेख यांनी सनाटा प्रतिनिधीला सांगितले असून मुलगा हा सुखरूपपने असल्याचे रेश्मा शेख यांनी सांगितले आहे.

मागील बातमी : कोंढवा तालाब मदरसातून एका अल्पवयीन मुलास पळवून नेले

सजग नागरिक टाइम्स :September 26, 2017: पुण्यातील kondhwa talab Madrasa त धार्मिक शिक्षण घेत असताना एका अल्पवयीन मुलास फूस लावून पळविण्यात आले आहे.

त्या अल्पवयीन मुलाच्या आईने (Kondhwa police station) कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार केली आहे.

सदरील प्रकरण पुढील प्रमाणे इजाज गौस शेख वय १५ वर्षे हा मुलगा रंगाने सावळा व अंगाने मध्यम ,नाक सरळ ,

चेहरा उभट असून याचे सातवी पर्यंत शिक्षण झालेले असून तो मराठी(marathi) , हिंदी (hindi) , (urdu)उर्दू भाषा बोलतो,

याच्या अंगात पांढरा कुर्ता व पायजमा  डोक्यात टोपी आहे , व जवळ मौल्यवान वस्तू वा पैसे नाहीत.

हे पण जरूर पहा ; पुण्यातील हॉटेल चालकाला एफ डी एचा दणका

हा कोंढवातील  तालाब मदरसात धार्मिक शिक्षण घेत असताना त्यास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून मदरसातून दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा दरम्यान  पळवून नेले आहे.

या संदर्भात त्याची आई रेश्मा गौस शेख वय ३५ ,रा,२४७ सिद्धेश्वर नगर भाग क्र.४ मजरेवाडी ता.उत्तर सोलापूर जिल्हा यांनी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.

याचे कोंढवा पोलीस स्टेशन जावक क्र .४९०५/२०१७ असून या मुला संदर्भात कोणास हि माहिती मिळाल्यास या नंबर वर संपर्क साधावा 9011998777 असे आव्हान करण्यात आले आहे.

One thought on “कोंढवा तालाब मदरसातील गहाळ मुलगा सुखरूप घरी परतला

Leave a Reply