corona patient death : पुण्यामध्ये काही तासातच पाच जणांचा मृत्यू
corona patient death : सजग नागरिक टाइम्स : पुणे : महाराष्ट्रात मुंबई नंतर पुण्यात करोनाचा संसर्ग सर्वाधिक झाला आहे .
पुण्यामध्ये काही तासातच पाच जणांचा मृत्यू झाला असून आता पर्यंत करोना मुळे बळी गेलेल्यांची संख्या हि १३ झाली आहे .
पुण्यामध्ये रोज नव्या रुग्णांची नोंद होत आहे.काळ मध्यरात्रीनंतर ९ नवे रुग्ण आढळले आहे.
ससून, नायडू ,हडपसर मधील नोबेल रुग्णालयात बहुतांश करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार चालू आहे.यातील ५ जणांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पुण्यातील काही पेठ भागातील परिसर होणार सील..!
त्यामध्ये ससूनमधील तिघांचा समावेश आहे.मृतांमध्ये एक ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अन्य दोनजण हडपसर व कोंढव्यातील होते, यातील एकाचे वय ५४ वर्षे तर दुसऱ्याचे वय ७१ होते.
नायडू रुग्णालयामध्ये एका ४४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांना अनियंत्रित मधुमेहाचा आजार होता.
4 एप्रिल पासून त्यास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते . त्यातही त्यांचे मूत्रपिंडहि रिकामे झाले होते आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हडपसर सय्यद नगर येथील एका ७३ वर्षीय जेष्ट नागरिकाचा मृत्यू झाला असून त्यांना मधुमेहाचा त्रास होता.
गोदी मीडीया ही दहशतवाद्यांची जमात ? | गोदि मीडीयामुळे देशात दहशतीचे वातावरण ?