HomePolice Newsजीवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गॅंगला 24 तासात अटक:खडक पोलिसांची उत्तम कामगिरी

जीवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गॅंगला 24 तासात अटक:खडक पोलिसांची उत्तम कामगिरी

Sajag Nagrikk Times: पुणे : ऐन संक्रातीच्या दिवशी भवानी पेठ येथील राहणाऱ्या एका तरुणावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या कोयता गँग मधिल आरोपीना खडक पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडुन २४ तासात अटक करण्यात आली आहे .

अधिक माहीती अशी की , फिर्यादी नामे प्रेम अनिल पाटोळे (वय २६ वर्षे , व्यवसाय रिक्षा चालक , रा .४११ , भिमाले संकुल पिंपळमळा , कासेवाडी) पुणे यास त्याची पार्क केलेली मोटार सायकल पाडल्यावरुन तिन महीन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी नामे १ ) अनिकेत व्यकंटेश कोळी २ ) शैलेश उर्फ साहील रामप्या बॅगरी ३ ) अजय रामप्पा बॅगरी वय ४ ) भरत व्यंकटेश कोळी यांनी कोयत्याने हल्ला करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला .

फिर्यादी प्रेम यांनी तक्रार दिल्यानंतर खडक पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांनी त्याबाबत तात्काळ दखल घेवुन दोन तपास पथके तयार केली व त्यांना तपासाबाबत सुचना दिल्या .

नेमण्यात आलेल्या तपास पथकाने गुप्त बातमीदारांमार्फत वेगाने तपास केल्याने गंभीर गुन्हयातील आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्यात यश आले .

सदरिल कारवाई खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश तटकरे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , राकेश जाधव सहा . पोलीस निरीक्षक , अतुल बनकर पोलीस उप निरीक्षक , आकाश विटे पोलीस उप निरिक्षक , व पोलीस अंमलदार अजीज बेग , संदीप तळेकर , विशाल जाधव , सागर घाडगे , लखन ढावरे , मंगेश गायकवाड , रफिक नदाफ , अक्षयकुमार वाबळे , नितीन जाधव , महेश पवार , महेश जाधव , योगेश चंदेल यांचे पथकाने केली.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular