“शिवाजी महाराज अंगार है” बाकी सब भंगार है, च्या घोषणा देत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

Aajke Shivaji Narendra Modi Book : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजां सोबत केल्याने संभाजी ब्रिगेड आक्रमक

aajke shivaji narendra modi book publish against sambhaji briged aandolan

Aajke Shivaji Narendra Modi Book Issue : सजग नागरिक टाइम्स : पुणे : संभाजी ब्रिगेड ने नेमके आंदोलन का केले त्यांचे म्हणणे काय हे जाणून घेऊ या

नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होऊच शकत नाही. ‘आज के शिवाजी… नरेंद्र मोदी’ हे पुस्तक खोटे आहे.

कारण छत्रपती शिवाजी महाराज तडीपार नव्हते, त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नव्हते किंवा त्यांनी नोट बंदीकरून रयतेला रांगेत उभारून जिवंत मारले ही नव्हते.

तसेच शिवाजी महाराज मुळात ते क्रूर नव्हते. मात्र दुसर्‍या बाजूला संपूर्ण उलट चित्र आहे हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. कारण त्यांच्यावर गुजरात मध्ये गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

भाजप शिवाजी महाराजांसोबत नरेंद्र मोदी यांची तुलना करून ‘काळा इतिहास पांढरा करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ श्याम जाजू महाराष्ट्राचे रहिवासी आहेत.

ते गद्दार निघतील असं वाटलं नव्हतं. जाजू यांच्या डोळ्यासमोर शिवरायांशी तुलना होत असताना ते मोदींच्या सत्तेपुढे इमान विकत बसले होते हे त्यातून स्पष्ट होतं.

शिवाजी महाराजांसोबत मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा नरेंद्र मोदी’सह कोणीही मोठा नाही…

हे ‘वादग्रस्त पुस्तक 8 दिवसाच्या आत भाजप ने तात्काळ पाठीमागे घ्यावे’ अन्यथा… महाराष्ट्रातील एकही भाजप कार्यालय

संभाजी ब्रिगेड ठेवणार नाही… असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प केंद्रिय निरीक्षक विकास पासलकर यांनी दिला.

Advertisement

या प्रसंगी संभाजी ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष प्रशांत धुमाळ , शिवमहोत्स समिती अध्यक्ष रवींद्र माळवदकर , मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,

सन्नी थोपटे, मंदार बहिरट, चंद्रशेखर घाडगे. महेंद्र जाधव इनक्रडिबल समाजसेवक गृप अस्लम इसाक बागवान,

Advertisement

भारतीय एकता महामोरचाचे साबीर शेख इत्यादी कार्यकर्ते आंदोलनामध्ये शामिल होते,

श्याम जाजू यांच्या घरापासून भाजप कार्यालयाची तोडफोड असा इशारा हि संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

Advertisement

पुणे लाल महाल येथे मावळ्यांच्या पगड्या धारण करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र निदर्शने करून आंदोलन करण्यात आले,

पुढील 48 तासात पुस्तकावर जर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात जे काही प्रश्न निर्माण होईल त्याला केंद्र सरकार जबाबदार असेल,

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्याबद्दल त्यांचा प्रचंड आदर आहे. मात्र तीन पट फालतू लेखक नरेंद्र मोदी यांची तुलना

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत असेल तरी ही शिवरायांच्या महाराष्ट्राची आणि त्यांच्या कर्तृत्वाशी भाजपने केलेली गद्दारी आहे.

Advertisement

आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या भाजपच्या दिल्ली कार्यालयात या पुस्तकाचा व लेखकाचा व भाजप’चा निषेध…

या पुस्तक प्रकाशन युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे वरिष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

धार्मिक सांस्कृतिक संमेलनामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू,

माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.

मात्र हा सोहळा नसून खोट्या इतिहासाचा व जाणीवपूर्वक केलेल्या विकृतीचा बाजार होता हेच या पुस्तकाच्या शिर्षकावरून व चित्रावरून स्पष्ट होते असे संभाजी ब्रिगेडचे म्हणने आहे .

Advertisement

2 thoughts on ““शिवाजी महाराज अंगार है” बाकी सब भंगार है, च्या घोषणा देत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

Comments are closed.